शिवसेनेच्या धगधगत्या मशालीने यापूर्वी इतिहास घडवलाय, बीएमसीवर फडकवला होता भगवा…

नगरसेवक, आमदार आणि खासदार यांच्या विजयाची सुरुवात ही शिवसेनेच्या मशाल चिन्हापासूनच झाली आहे.

शिवसेनेच्या धगधगत्या मशालीने यापूर्वी इतिहास घडवलाय, बीएमसीवर फडकवला होता भगवा...
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 11, 2022 | 12:50 PM

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला निवडणूक आयोगाकडून (Election Commission) नाव आणि चिन्ह जाहीर झाल्यानंतर आता त्या चिन्हाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर विविध नेते जूना इतिहास देखील सांगत आहे. त्याचदरम्यान उद्धव ठाकरे गटाने बीएमसीवर सत्ता आणि पहिला शिवसेना पुरस्कृत आमदार याच मशाल चिन्हावर निवडून आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मिळालेले चिन्ह आणि त्यावर पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे असे नाही. खरंतर, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट शिवसेनेत पडले आहेत. त्यांचा वाद थेट न्यायालयात गेला आहे. मात्र, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत निवडणुकीला सामोरे जात असतांना उद्धव ठाकरे यांचा गट निवडणूक लढणार आहे. तिथे पक्षाचे नाव आणि चिन्ह यावरून आयोगाच्या दरबारी दोन्ही गट उभे ठाकले होते. त्यावरून ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि धगधगती मशाल हे चिन्ह मिळालेले आहे.

धगधगत्या मशालीवर शिवसेनेचा पाहिला आमदार-
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ हे कधीकाळी बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू आणि कट्टर शिवसैनिक होते. भुजबळ यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवत असतांना शिवसेनेकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली होती. तर मार्च 1985 मध्ये झालेल्या माझगाव मतदारसंघात भुजबळ यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती तेव्हा भुजबळ हे शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार होते त्यावेळी त्यांनी सेनेच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यात ते शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून निवडून आले होते.

मशाल चिन्हावरच विजय मिळवत बीएमसीवर भगवा-
एप्रिल 1985 मध्येच बीएमसीची निवडणूक झाली होती. त्यावेळ दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात स्वबळावर निवडणूक सेनेने लढवली होती. त्यात शिवसेनेकडील उमेदवारांना धगधगती मशाल हेच चिन्ह होते. त्यात 74 नगरसेवकांनी विजय मिळवला होता. त्यात शिवसेनेची बीएमसीवर सत्ता आली होती.

शिवसेनेचा पाहिला खासदारही मशाल चिन्हावरच विजयी-
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात 1989 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून मोरेश्वर सावे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे चिन्ह देखील मशालच होते. त्यात सावे हे विंजयी झाले होते.

नगरसेवक, आमदार आणि खासदार यांच्या विजयाची सुरुवात ही शिवसेनेच्या मशाल चिन्हापासूनच झाली आहे.

मशाल चिन्ह शिवसेनेला मिळताच राज्यभर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे.

बाळासाहेबांनी काढलेले व्यंगचित्र देखील सोशल मीडियावर शेयर करून मशाल चिन्ह हे ठाकरे गटाचे चिन्ह असल्याचे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.