कुणाल कामराला संजय राऊतांचा मोठा सल्ला, म्हणाले “आपण…”

कुणाल कामरा यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोन्हा मारणाऱ्या गाण्यामुळे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून, कामरांनी देशद्रोह किंवा खून केला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.

कुणाल कामराला संजय राऊतांचा मोठा सल्ला, म्हणाले आपण...
sanjay raut and kunal kamra
| Updated on: Apr 05, 2025 | 11:44 AM

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं केले होते. यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी अनेकदा समन्स बजावले. मात्र अद्याप कुणाल कामरा चौकशीसाठी हजर राहिलेला नाही. कुणालविरोधात राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतरही तो सातत्याने सोशल मीडियावरुन विविध पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामराला एक सल्ला दिला आहे.

संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊतांना कुणाल कामराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. त्याने खुन केला आहे का? देशद्रोह केला का? असा सवाल संजय राऊतांनी केला.

गृह खातं शेण खात असलं तरी…

“कुणाल कामराने खून केला आहे का? देशद्रोह केला आहे का? बँकॉकला फिरत आहेत का? ते नवाब शरीफचा केक कापला गेलेत का? या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. माझं बोलणं झालं मी त्यांना सांगितलं आपण कायद्याचे रक्षक आहोत जरी गृह खात शेण खात असलं तरी आपल्याला कायदा पाहायला पाहिजे”, असे संजय राऊत म्हणाले.

“या बिलाला पाठींबा देण्याची विनंती”

“शिंदे गटाचे लोक डरपोक आहेत. त्यांना घाबरवून पक्ष सोडायला लावला आहे.आम्ही खऱ्या शिवसेनेचे लोक आहोत. आमच्यावर दबाव होता, आज आहे, तेव्हा आम्ही उभे टाकलो आहेत, आजही आहोत. या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबध आहे. भ्रष्ट्राचाराला फ्रेम करण्यासाठी हे बिल आणले आहे. भाजपचे मोठे नेते शेवटपर्यंत आमच्या संपर्कात होते. या बिलाला पाठींबा देण्याची विनंती करत होते. राज्यसभेत सुध्दा नवीन पटनायक यांच्यावर सुध्दा मोदींचा दबाव होता.  ७ खासदारांच्या पाठींब्यासाठी शेवटपर्यंत थांबले होते. असली जनाब कोण आहे, अमित मीय़ा शहा हे जनाब आहे”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.