मोठी बातमी! ठाकरेंच्या खासदाराच्या गाडीचा विक्रोळीत अपघात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला येत असताना खासदार संजय दीना पाटील यांच्या कारचा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

मोठी बातमी! ठाकरेंच्या खासदाराच्या गाडीचा विक्रोळीत अपघात
Sanjay Dina Patil Car Accident
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 14, 2026 | 3:11 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला येत असताना खासदार संजय दीना पाटील यांच्या कारचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला आहे. विक्रोळी महामार्गावर हा किरकोळ अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बैठकीला येताना अपघात

आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला ऑनलाईन आणि ऑफलाईल पद्धतीने खासदार हजर होते. या बैठकीला येत असताना खासदार संजय दीना पाटील हे येत असताना विक्रोळी हायवेवर त्यांच्या गाडीचा अपघात झाला. ताफ्यातील अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या. यात काही गाड्यांचे किरकोळ निकसान झाले आहे. या अपघातानंतर संजय दीना पाटील यांनी ठाकरेंच्या बैठकीला हजेरी लावली.

सगळे खासदार बैठकीला हजर

गेल्या काही काळापासून शिवसेनेचे खासदार फुटणार असं बोललं जात होतं, त्यामुळे या बैठकीला खास महत्व प्राप्त झालं होतं. या बैठकीनंतर बोलताना खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, आजच्या बैठकीला 9 पैकी 9 खासदार उपस्थित होते. 9 पैकी 4 खासदार या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. तर 5 खासदार हे या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली. अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाझे हे खासदार या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. तर दुसरीकडे ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख आणि संजय जाधव हे सर्व खासदार या बैठकीसाठी ऑनलाईन उपस्थित होते, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.

ऑनलाईन हजर असणारे खासदार उद्धव ठाकरेंना प्रत्यक्ष भेटणार

आजच्या बैठकीला 5 खासदार हे काही वैयक्तिक कारणामुळे हजर राहू शकले नाहीत. मात्र आता पुढील काही दिवसात हे खासदार उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचीही माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. आम्ही सर्व एक आहोत आणि आगामी काळात अशा बैठका होणार असल्याचेही आता समोर आले आहे.

Follow Us