वाल्मिक कराडच्या दुसऱ्या बायकोच्या सालगड्याचा धक्कादायक खुलासा, खळबळजनक आरोप

वाल्मिक कराडवर मोकोका लावण्यात आल्यानं त्याच्या अडचणीत आधीच मोठी वाढ झाली आहे, आता त्याच्या दुसऱ्या बायकोच्या साल गड्यानं खळबळजनक आरोप केला आहे.

वाल्मिक कराडच्या दुसऱ्या बायकोच्या सालगड्याचा धक्कादायक खुलासा, खळबळजनक आरोप
| Updated on: Jan 18, 2025 | 4:07 PM

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर देखील आरोप करण्यात आले. त्याच्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या, फरार असलेला वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आला. त्यानंतर त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या वाल्मिक कराडचा पाय आता आणखी खोलात फसला आहे.  दरम्यान हे सर्व सुरू असताना आता वाल्मिक कराड याची दुसरी पत्नी  ज्योती मंगल जाधव यांच्या शेतात काम करणाऱ्या सालगड्यानं गंभीर आरोप केला आहे.

वाल्मीक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.  लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील शिंदे माने हे कुटुंब ज्योती जाधव यांच्या शेतात काम करतं, मात्र या कुटुंबाला गेल्या तीन महिन्यांपासून मजुरीच न मिळाल्याचा आरोप शिंदे माने कुटुंबाकडून करण्यात आला आहे.

गेल्या सात महिन्यापासून हे कुटुंब वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या शेतात काम करते. मात्र  गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ज्योती मंगल जाधव यांनी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केली नसल्याचा दावा या कुटुंबानं केला आहे. त्यामुळे आता या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. हे कुटुंब गेल्या तीन महिन्यांपासून मुलांना मिळणाऱ्या शाळेतील तांदुळावर आपली भूक भागवत आहे.

दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात वाल्मीक कराड यांची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर 36 एकर जमीन असल्याचं एक ट्विट केलं होतं. बार्शीतल्या शेंद्री गावात एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधव यांच्या नावावर  खरेदी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्याच क्षेत्रफळ साधारण 36 एकर इतकं आहे तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतके आहे. दोन वर्षात कालावधीत या चार ही जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत.