जिने जन्म दिला,तिला अखेरचा निरोप तरी व्यवस्थित द्यायचा ना.. आईच्या अंत्यसंस्काराकडे 8 मुलांची पाठ

उतारवयात, शरीर साथ देत नव्हतं तेव्हा मुलींनी आईचा सांभाळ करायचा सोडून, तिला आधार देणं सोडून तिला वाऱ्यावर सोडलं. त्या क्रूर मुलींनी आणि एका मुलाने आईची 8 एकर जमीन बळकावली. पण आईला ऐकू येईनासं झालं आणि दृष्टी कमी झाल्यानंतर त्याच मुलींनी आपल्या आईला एका मंदिरात बेवारस अवस्थेत सोडलं.

जिने जन्म दिला,तिला अखेरचा निरोप तरी व्यवस्थित द्यायचा ना.. आईच्या अंत्यसंस्काराकडे 8 मुलांची पाठ
मुलांनी पाठ फिरवल्यानंतर प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनीच आजींवर अंत्यसंस्कार केले
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 07, 2025 | 11:35 AM

आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही.. आपल्या संस्कृतीत आईला देवाचा दर्जा दिला जातो, तिची पूजा केली जाते. पण सध्याच्या कलियुगात जन्मदात्या आईच्या जीवावर उठणारे किंवा तिच्या वृद्धापकाळात तिची साथ सोडणारे अनेक लोक असतातं, हृदयाला पीळ पाडणाऱ्या अनेक घटना समोर येत असतात, ज्यामुळे मनही व्यथित होतं. अशीच एक घटना सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात पहायला मिळाली. तेथे जन्मदात्री आई आणि मुलींच्या नात्यातील मायेचा ओलावा आटल्याचे भयाक, विदारक चित्र दिसलं. ज्या आईने एक – दोन न्वहे 8 मुलांना जन्म दिला, काबाडकष्ट करून, रक्ताचं पाणी करून त्या मुलांना वाढवलं, मोठं केलं. त्याच आईच्या अखेरच्या क्षणी तिच्या 8ही मुलांनी तिच्याकडे पाठ फिुरवली. जन्मदात्या आईचा मृतदेह समोरून गेला मात्र अंत्यसंस्कारासाठी 8 मुली अन् सख्खा भाऊदेखीवल पुढे न आल्याने अतिशय हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिमाबाई नागनाथ चटके (वय 75) असे त्या मृत दुर्दैवी आईचे नाव आहे. उतारवयात, शरीर साथ देत नव्हतं तेव्हा मुलींनी आईचा सांभाळ करायचा सोडून, तिला आधार देणं सोडून तिला वाऱ्यावर सोडलं. त्या क्रूर मुलींनी आणि एका मुलाने आईची 8 एकर जमीन बळकावली. पण आईला ऐकू येईनासं झालं आणि दृष्टी कमी झाल्यानंतर त्याच मुलींनी आपल्या आईला एका मंदिरात बेवारस अवस्थेत सोडून दिलं. पण त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार तिथेच संपले नाहीत, मुलींनी आईला सांभाळण्यास तर नकार दिलाच पण अखेरच्या क्षणी, शेवटचा श्वास घेतल्यानंतरही त्या माऊलीचे अंत्यसंस्कार करण्यास कोणीच पुढे आलं नाही.

अनाथ आश्रमात आजींनी घेतला अखेरचा श्वास, पण अंत्यसंस्कारांकडे मुलांची पाठ

भिमाबाई नागनाथ चटके (वय 75) या आजींनी मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथील प्रार्थना फाउंडेशनच्या प्रसाद मोहिते आणि अनु मोहिते या दाम्पत्याने सांभाळलं. त्यांची जीवापाड काळजी घेतली, शुश्रुषा केली. मात्र 2 एप्रिल रोजी भिमाबाई यांचा वृद्धापकाळमुळे मृत्यू झाला. आश्रमातील प्रसाद यांनी त्यांच्या मुलींना आजींच्या मृत्यूबद्दल माहिती दिली, ते ऐकून मुली तिथे आल्या, पण 8 पैकी एकही मुलगी किंवा त्यांचा मुलगाही अंत्यसंस्कारांसाठी पुढे आला नाही.

धक्कादायक गोष्ट म्हणजे 8 पैकी 5 मुलींनी आणि भावाने तेथून लागलीच काढता पाय घेतला. तर उरलेल्या तीन मुलींनी, अंत्यसंस्काराचे काय ते तुम्हीच बघा, असे म्हणत घरची वाट पकडली. विशेष म्हणजे वडिलांच्या निधनानंतर आईच्या वाट्याची 8 एकर जमीन सर्व बहिणींनी वाटून घेतली, पण तिचा सांभाळ एकीनेही केला नाही. या घटनेमुळे जन्मादाती आई आणि मुलींच्या नात्यातील ओलावा आटल्याचे पाहायला मिळाले. जिने जन्म दिला, तिला अखेरचा निरोप मानाने देण्यास, तिचे अंत्यसंस्कार करण्यास कोणीच पुढे आलं नाही.

अखेर प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनीच त्यांच्या सहकाऱ्यांसोबत मिळून पुढाकार घेतला आणि भीमाबाई चटके यांच्यावर अंत्यसंस्कार केले. माणूसकीला, आई-मुलांच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे सोलापूरमध्ये हलहळ व्यक्त होत आहे.