पुण्यातील मंदार किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट, येरवडा तुरुंगातच..

मंदार किवळे प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यातच या प्रकरणाला आता वेगळे वळण लागल्याचे बघायला मिळत आहे. मोठी माहिती पोलिसांच्या हाती लावली असून सर्व कट कुठे रचला याबाबत थेट माहिती मिळाली.

पुण्यातील मंदार किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट, येरवडा तुरुंगातच..
Mandar Kiwale
| Updated on: Nov 27, 2026 | 9:20 AM

पुणे कोर्टाबाहेर धक्कादायक प्रकार घडला. कोणीही विचार केला नाही, अशी घटना घडली. मंदार किवळे याच्यावर पुणे कोर्टाच्या गेट क्रमांक 4 बाहेर हल्ला करण्यात आला. भरदिवसा हा हल्ला झाल्याने सर्वांना धक्का बसला. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडला. मंदार किवळे याच्यावर हा हल्ला झाला. तो चार दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आला होता. शुभम चव्हाण प्रकरणात तो आरोपी होता. यामध्येच आता वेगळा अॅंगल पुढे येत आहे. थेट येरवडा तुरुंगाचे कनेक्शन पुढे आले. तुरुंगातील 19 वर्षीय आरोपीचाही यात समावेश आहे. शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला प्रकरणात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुभाष चव्हाण वय 20, अमोल चव्हाण वय 48, स्वप्नील गवळी वय 28 तिघेही कात्रजचे रहिवासी), ओंकार ऊर्फ बाब्या संतोष पवार वय 18, सूरज साधू मळेकर वय 19 रा. मोहननगर, धनकवडी आणि सत्यम सदाशिव मोरे वय 25 अशी आरोपींची नावे आहेत.

कोर्टाने सर्व आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील एका अल्पवयीन आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात अर्थव सोपान मारणे वय 19 याचा सहभाग असल्याचे पुढे आले. यातील धक्कादायक म्हणजे अर्थव मारणे हा येरवडा जेलमध्ये आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जेलमध्ये राहूनच आरोपींना शस्त्रे उपलब्ध करून दिल्याचा मोठा संशय आहे.

Loading...

याबाबत अधिकचा तपास हा पोलिसांकडून केला जात आहे. अर्थव मारणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. 18 नोव्हेंबर 2026 रोजी भारतीय विद्यापीठ हद्दीत पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. त्यावेळी त्याच्याकडे दो देशी बनावटीचे पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली होती. यासोबतच मुद्देमालही जप्त करण्यात आला होता. त्याच्यावर अनेक गुन्हे अगोदरच दाखल आहेत.

आता जेलमध्ये राहून मंदार किवळे याच्या प्रकरणात तो कसा सहभागी झाला आणि कट कसा रचला, याचा तपास हा पोलिसांकडून केला जात आहे. त्यानेच अक्षय चव्हाण टोळीला शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून या प्रकरणात चाैकशी केली जात आहे. या प्रकरपणानंतर सरकारवर टीका केली जात असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us