AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिला माझ्या मदतीची गरजच काय? सुनेच्या आरोपांवर सुदेश बेरी स्पष्टच बोलले, नेमकं काय घडलं?

Sudesh Berry: अभिनेता सुदेश बेरी यांची सून आणि 'रोडीज' फेम शांभवी शर्मा हिने सासरच्या मंडळींकडून करिअरसाठी कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप केला होता. आता या आरोपांवर सुदेश बेरी यांनी मौन सोडलं आहे.

तिला माझ्या मदतीची गरजच काय? सुनेच्या आरोपांवर सुदेश बेरी स्पष्टच बोलले, नेमकं काय घडलं?
सुदेश बेरी आणि त्यांची सून शांभवी शर्माImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 27, 2026 | 9:10 AM
Share

Sudesh Berry: बॉलिवूडमध्ये अनेकदा कलाकारांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीच अधिक चर्चा रंगताना दिसते. सध्या ज्येष्ठ अभिनेते सुदेश बेरी यांच्या कुटुंबातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. सुदेश बेरी यांची सून आणि ‘एमटीव्ही रोडीज’मधून लोकप्रिय झालेली शांभवी शर्मा हिने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते. लग्नानंतर करिअर थांबवावं लागलं, सासरच्या मंडळींकडून अपेक्षित मदत मिळाली नाही, असे आरोप तिने केले होते. आता या आरोपांवर सुदेश बेरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या वक्तव्याची सध्या मनोरंजनविश्वात चर्चा सुरू आहे.

‘शांभवी माझी सून नाही, तर मुलगीच आहे’

‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सुदेश बेरी यांनी शांभवीच्या आरोपांवर आपली बाजू मांडली. ते म्हणाले, की शांभवी केवळ त्यांची सून नसून मुलीसारखीच आहे. इंडस्ट्रीमध्ये नव्याने येणाऱ्या प्रत्येक कलाकाराला, मग तो आपला नातेवाईक असो किंवा नसो, आपण नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे. इंडस्ट्रीतील प्रत्येकाला ते आपल्या मुलांप्रमाणे मानतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, प्रत्येकाला यश मिळवून देणं आपल्या हातात नसल्याचं त्यांनी म्हटलं. एखाद्याच्या नशिबात जे नाही, ते मिळवून देण्यासाठी आपण मदत करू शकत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं. इतकंच नाही तर शांभवीच्या करिअरला मदत करण्याच्या अपेक्षेवर त्यांनी खोचक टिप्पणीही केली. ‘शांभवी, तिच्या नावाप्रमाणेच ती स्वतः देवीचं एक रूप आहे. मग तिला तिच्या करिअरसाठी माझ्या मदतीची गरजच काय?’ असा सवाल त्यांनी केला.

शांभवीने सासरच्या मंडळींबद्दल काय सांगितलं होतं?

काही दिवसांपूर्वी शांभवीने सिद्धार्थ कन्नन याच्या पॉडकास्टमध्ये आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला होता. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी वयाच्या 18व्या वर्षी ती प्रेमात पडली होती. लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांत ती पतीसोबत ऑस्ट्रेलियाला गेली. यासाठी तिने भारतातील सुरू असलेलं करिअर आणि व्यावसायिक संधी मागे सोडल्या. बॉलिवूड कुटुंबात लग्न केल्यानंतर आपल्याला मनोरंजनविश्वात काम करण्यासाठी मदत मिळेल, अशी तिची अपेक्षा होती. सासरे आपल्याला प्रमोट करतील, इंडस्ट्रीतील ओळखी करून देतील, असं तिला वाटलं होतं. मात्र, प्रत्यक्षात असं काहीच घडलं नाही आणि आपण आपल्या स्वप्नांपासून दूर जात गेलो, असं तिने सांगितलं.

ऑस्ट्रेलियातील सुरुवातीच्या काळात आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागला. एका टप्प्यावर जेवणासाठी पैसे नसल्याने ब्रेड आणि पाण्यावर दिवस काढावे लागल्याचा दावाही तिने केला. शांभवीने तिच्या आयुष्यातील संघर्ष, करिअरमधील खंड आणि वैवाहिक नात्यातील अडचणींबद्दल भाष्य केलं आहे. दुसरीकडे, सुदेश बेरी यांनी तिच्या आरोपांना आपली बाजू मांडत उत्तर दिलं आहे. त्यामुळे या कौटुंबिक वादाची चर्चा आता पुन्हा रंगली आहे.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला