AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPS विश्वास नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये! नायलॉन मांजाने पतंग उडवल्यास कडक कारवाई होणार; थेट…

IPS विश्वास नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आता नागपुरात नायलॉन मांजाने पतंग उडवल्यास कडक कारवाई होणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई होईल.

IPS विश्वास नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये! नायलॉन मांजाने पतंग उडवल्यास कडक कारवाई होणार; थेट...
ips vishwas nangare patilImage Credit source: ips vishwas nangare patil
| Updated on: Nov 27, 2026 | 9:06 AM
Share

नागपुरातून मोठी बातमी हाती आली आहे. पंतग उडवण्यासाठी जीवघेणा मांजाचा वापर करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली जाणार आहे. नायलॉन मांजाचा वापर करून पंतग उडवणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नागपूर पोलिसांकडून ही कारवाई केली जाणार आहे. नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत वृत्तपत्रात सार्वजनिक सूचना जारी करत नागपूरकरांना आवाहन केलं आहे.

नागपुरात प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास प्रत्येक उल्लंघनासाठी 25 हजार रुपये दंड आणि अल्पवयीन असल्यास दंडाची रक्कम पालकांकडून वसूल केली जाईल. विक्रेत्याकडून प्रत्येक उल्लंघनासाठी 2 लाख 50 हजार रुपये दंड  करण्यात येईल.  घटनास्थळी दंडाची रक्कम न भरल्यास 15 दिवसाचे आत नोटीस देण्यात येईल. त्यानंतर देखील 15 दिवसात न भरल्यास सक्षम अधिकाऱ्यांमार्फत ‘जमीन महसूल’ म्हणून वसूल केला जाईल. नायलॉन मांजा वापर, विक्री किंवा साठ्याबाबत काही तक्रार असल्यास 112 या पोलिसांच्या हेल्पलाईनवर तक्रार करता येणार आहे.  नागपूर सायबर पोलिस व्हाट्सअप क्रमांकवर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलंय.  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार नागपूर पोलीस आयुक्तालयाने सर्वसामान्य जनतेसाठी या सूचना जारी केली आहे.

पोलीस, प्रशासन थेट कारवाई करणार 

दरम्यान, नायलॉन मांजामुळे अनेक दुचाकीस्वारांचे गळे कापल्याने गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या नायलॉन मांजामुळे काही दुचाकीस्वारांना प्राण देखील गमवावे लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. खरंतर महाराष्ट्रातील विविध भागात चायनीज मांजा, नायलॉन मांजाची विक्री होते. दुकानदारांकडून छुप्या पद्धतीने  ही बंदी असलेल्या मांजाची विक्री केली जाते. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाने या दुकानदारांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील विविध भागातील पोलीस , प्रशासनाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या मांजा विक्रीवरून नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आता पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील काय कारवाई करातात, हे पाहावे लागेल.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला