AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : पत्नी, मित्र अन् मुलगा यांची खरी परीक्षा कधी? पाहा चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये पत्नी, मित्र आणि मुलगा कसा असावा? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

Chanakya Niti : पत्नी, मित्र अन् मुलगा यांची खरी परीक्षा कधी? पाहा चाणक्य काय म्हणतात?
चाणक्य Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 27, 2026 | 9:26 AM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. एक आदर्श पत्नी कशी असावी? मित्र कसा असावा? आणि चांगला मुलगा कोणाला म्हणावं? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच पत्नी, मुलगा आणि मित्र यांची खरी परीक्षा कधी असते, याबद्दल देखील चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे. चाल तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

पत्नीची परीक्षा कधी – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही गरीब होतात, तुमच्याकडे पैसा उरत नाही, तुम्हाला हलाकीचे दिवस येतात, जर अशा स्थितीमध्ये तुमची पत्नी तुमच्या सोबत राहत असेल, ती तुम्हाला खंबीरपणे साथ देत असेल, त्या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी बळ देत असेल तर अशा पत्नीला आदर्श पत्नी मानावं, तुम्ही जेव्हा निर्धन असता, तेव्हाच तुमच्या पत्नीची खरी परीक्षा असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मित्राची परीक्षा कधी – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही एखाद्या फार मोठ्या संकटात सापडता. असं संकट ज्या संकटामध्ये तुमची जो व्यक्ती मदत करेल त्याचं देखील नुकसान होण्याची शक्यता असते, अशा संकटात जो तुमच्या मदतीसाठी धावून येईल तोच तुमचा खरा मित्र असतो. संकट काळात मित्राची खरी परीक्षा होते, असं चाणक्य म्हणतात.

मुलांची परीक्षा कधी- चाणक्य म्हणतात तुमच्या म्हातारपणात तुमची मुलं तुम्हाला कशी सांभाळतात, यावरून मुलांची खरी परीक्षा होत असते. तुमची मुलं तुमची कशी काळजी घेतात, यावरून त्यांचे संस्कार दिसून येतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. आई-वडिलांचा उत्तम प्रकारे सांभाळ करणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य असतं, असंही चाणक्य म्हणतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला