LEOPARD RESCUE : मध्यरात्री शिकार शोधत असलेला बिबट्या कुंपणात अडकला, जोरात ओरडू लागला, आवाजानं गाव घाबरलं, मग…

रानटी जनावरांच्या शोधात असलेला बिबट्या कुंपणात अडकला, आवाजानं गावकऱ्यांची उडाली भंबेरी, सहनही होईना आणि सांगताही येईना, शेवटी...

LEOPARD RESCUE : मध्यरात्री शिकार शोधत असलेला बिबट्या कुंपणात अडकला, जोरात ओरडू लागला, आवाजानं गाव घाबरलं, मग...
LEOPARD RESCUE
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 02, 2023 | 11:12 AM

सिंधुदुर्ग : आचरा पारवाडी (aachara parwadi) येथे रानटी जनावरांसाठी कुंपणात लावलेल्या फासक्यात बिबट्या (LEOPARD RESCUE)अडकला, मध्यरात्री बिबट्या अडकल्याने रात्री आवाजाने ओरडून अख्खं गाव जागं केलं. बिबट्या इतक्या जोरात ओरडत होता, की सहनही होईना आणि सांगताही येईना. गावकऱ्यांची झोप उडाली, अखेरीस बॅटरीच्या उजेडात ग्रामस्थांनी बिबट्या सापळ्यात अडकल्याची माहिती वनविभागाला (forest department)दिली. त्यानंतर वनविभाग रात्रीत तिथं दाखल झालं. बिबट्याला पाहायला घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

आचरा पारवाडी येथील त्रैवार्षिक हरिनाम सप्ताहाच्या पूर्व तयारीसाठी ब्राम्हण देव मंदिर येथे रात्री जमलेल्या ग्रामस्थांना जोरात आवाज येत होता. त्यामुळे संपुर्ण त्या आवाजाने घाबरलं, त्यानंतर काही जणांनी बॅटरीच्या साहाय्याने शोध घेतला त्यावेळी तिथं बिबट्या कुंपणात अडकल्याचे लक्षात आले.
माहिती मिळताचं वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले. घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दीही उसळली होती. जाळ्यांचा वापर करुन कुंपणात अडकलेल्या मादी जातीच्या बिबट्याला पिंजऱ्या बंद केले.

महाराष्ट्रात बिबट्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे बिबट्याच्या रोज वेगवेगळ्या घटना उघडकीस येत आहेत. मागच्या महिन्यात पुण्यात शिकारीसाठी गेलेला बिबट्या जाळवंडात अडकला होता. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी ही माहिती वनविभागाच्या कानावर घातली. त्यानंतर त्यांनी बिबट्याची सुटका केली.