सौ दाऊद, एक राऊतच्या घोषणा… ठाण्यातील दहीहंडी उत्साहातील घोषणा ऐकताच संजय राऊत मंचाहून म्हणाले..

शिवसेना नेते संजय राऊत ठाण्यातील दहीहंडी उत्साहात सहभागी झाले होते. यादरम्यान असे काही घडले की, संजय राऊत यांना गोविंदाना सांगावे लागले की, हा दहीहंडी उत्सव आहे रे... आदित्य ठाकरेही ठाण्यातील दहीहंडी उत्साहात पोहोचले होते.

सौ दाऊद, एक राऊतच्या घोषणा... ठाण्यातील दहीहंडी उत्साहातील घोषणा ऐकताच संजय राऊत मंचाहून म्हणाले..
Sanjay Raut
| Updated on: Sep 06, 2026 | 6:50 AM

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह बघायला मिळाला. विविध ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. जवळपास राज्यातील नेते या उत्साहात सहभागी झाली. त्यातच मुंबईत तर या दहीहंडी उत्साहाची एक वेगळीच क्रेझ बघायला मिळते. त्यातच आनंद चॅरिटेबल ट्रस्टकडून महा दहीहंडीचे आयोजन शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आले. यावेळी असे काही घडले की, संजय राऊत यांनाही हा दहीहंडी उत्साह असल्याची आठवण कार्यकर्त्यांना करून द्यावी लागली. संजय राऊत दहीहंडीच्या उत्साहाच्या ठिकाणी पोहोचले असतानाच गोविंदा पथके आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत केले. ठाण्याच्या दहीहंडी उत्साहाबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, मी आज मुंबईत फिरलो नाही पण ठाण्यातील उत्साह काही वेगळाच असतो.

अप्रितम वातावरणात दहीहंडी उत्सव साजरा होतो. यादरम्यान जांभळी नाका परिसरात लोक मोठ्या संख्येने जमले होते. संजय राऊत मंचावर पोहोचताच गोविंदांकडून थेट सौ दाऊद…एक राऊत… अशा घोषणा देण्यास सुरूवात करण्यात आली. यावर संजय राऊत यांनी वेळ न घालता थेट म्हटले की, अरे बाबा ही दहीहंडी आहे. यावेळी त्यांनी गोविंदांच्या उत्साहाचे काैतुकही केले.

यावेळी बोलताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांची आठवण काढत त्यांच्या ठाण्यात आपण जमलो असल्याचे म्हटले. आपल्याला हळूहळू थर वाढवत विधानसभेमध्ये जायचे असल्याचेही यादरम्यान मोठे विधान त्यांनी केले. मुंबईपेक्षा ठाण्यात दहीहंडीचा उत्साह अधिकच असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ठाण्यात एक वेगळाच उत्साह लोकांमध्ये बघायला मिळाला.

गाैतमी पाटीलने मुंबईतील अनेक दहीहंडींना हजेरी लावली. यासोबतच अनेक बॉलिवूड कलाकारांनीही या दहीहंडी उत्साहाला हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपरमध्ये आमदार राम कदम यांनी आयोजित केलेल्या ‘हीहंडी उत्सवात हजेरी लावली. यावेळी त्यांनी हजारो गोविंदांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले. आदित्य ठाकरे यांनीही ठाण्यातील दहीहंडी उत्सावाला हजेरी लावली. सूर्यकुमार यादव याचाही एक दहीहंडी उत्साहातील व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तो मराठीत संवाद साधताना दिसतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us