नको त्या नादाला लागला, आधी अख्ख्या कुटुंबाची हत्या अन् नंतर मुख्यध्यापकाने उचललं टोकाचं पाऊल, सोलापूर हादरलं

सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे, मुख्यध्यापकाने आधी आपल्या संपूर्ण कुंटुबाची हत्या केली, त्यानंतर त्याने स्वत:ही गळफास घेतला आहे.

| Updated on: Jun 12, 2026 | 4:18 PM
1 / 7
सोलापूरच्या बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्याध्यापकाने आधी आपलं संपूर्ण कुटुंब संपवलं, आणि त्यानंतर त्याने स्वत: देखील आत्महत्या केली आहे. या घटनेनं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्याध्यापकाने आधी आपलं संपूर्ण कुटुंब संपवलं, आणि त्यानंतर त्याने स्वत: देखील आत्महत्या केली आहे. या घटनेनं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

2 / 7

योगेश पाटील असं या आत्महत्या केलेल्या मुख्यध्यापकाचं नाव आहे, योगेश पाटील यांनी आधी पत्नी माधुरी पाटील, मुलं अथर्व आणि शिवांश पाटील यांची हत्या केली, त्यानंतर त्यांनी स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

3 / 7

समोर आलेल्या माहितीनुसार योगेश पाटील यांनी आधी पत्नी माधुरी पाटील, मुलं अर्थव पाटील आणि शिवांश पाटील यांना विष दिलं, त्यानंतर त्यांनी स्वत: देखील आत्महत्या केली.

4 / 7

बार्शी तालुक्यातील हत्तीज गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. योगेश पाटील हे नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

5 / 7

समोर आलेल्या माहितीनुसार योगेश पाटील यांना शेअर मार्केटचा नाद होता. त्यांनी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. मात्र त्यांना शेअर मार्केटमध्ये सातत्याने नुकसान झालं.

6 / 7

शेअर मार्केटमुळे त्यांच्या डोक्यावर तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयांचं कर्ज झालं. याच कर्जाच्या विवंचनेतूनच त्यांनी संपूर्ण कुटुंब संपवलं आणि त्यानंतर स्वत: देखील आत्महत्या केली.

7 / 7

दरम्यान पोलिसांना घटनास्थळी 22 पानांची सुसाईड नोट मिळाली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us