Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणाऱ्या महिला उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळली

Maratha Reservation : या महिला कोण आहेत? कुठे उपोषणाला बसल्या आहेत?. वैद्यकीय टीम, तहसीलदार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणा संदर्भात काल मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पडली.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणाऱ्या महिला उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळली
maratha reservation
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 9:39 AM

बार्शी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्यावं अशी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. मनोज जरांगे पाटील यांची ढासळणारी प्रकृती पाहून अंतरवाली सराठी येथील महिलांनी त्यांना वैद्यकीय उपचार घेण्यासंदर्भात विनवणी केली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी औषध उपचार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना सलाईन लावण्यात आले. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसलेल्या महिलेची तब्येत खालावली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात सासुरे गावात या महिला उपोषणाला बसल्या आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी गेल्या तीन दिवसांपासून अखिल भारतीय छावा संघटनेच बार्शीत उपोषण सुरू आहे. तिसऱ्या दिवशी महिला उपोषणकर्त्या वैशाली आवारे यांची प्रकृती खालावली. वैद्यकीय टीम, तहसीलदार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बार्शी तालुक्यातील सासुरेमध्ये गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्या वैशाली आवारे यांना सलाईन लावण्यात आले असून, औषधोपचार सुरू आहेत. उपोषणकर्त्यांचा अन्नत्याग सुरू असून, जोपर्यंत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचा निर्णय घेण्यात आलाय. सरकारचे हे प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील यांना भेटणार

दरम्यान काल मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. यात मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली व त्यांना सर्वपक्षीयांच्यावतीने उपोषण मागे घेण्याच आवाहन करण्यात आलं. सर्वपक्षीय बैठकीनंतर सरकारचे प्रतिनिधी मनोज जरंगे पाटील यांची भेट घेणार आहेत. संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर मनोज जरंगे यांची भेट घेणार आहेत. मनोज जरंगे आज आंदोलन मागे घेणार का.? सर्वत्र चर्चा आहे. संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर उपोषण सोडवण्यासाठी आज प्रयत्न करणार आहेत. आज अकरा वाजता संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर मनोज जरंगे यांची भेट घेणार आहेत.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.