मालदीवनंतर आणखी एक शेजारी देश भारताशी पंगा घेण्याच्या तयारीत

भारत आणि मालदीव या दोन देशांमधील संबंथ बिघडले आहेत. पण आता नेपाळमध्ये सत्तेत सहभागी झालेले प्रचंड देखील भारताशी पंगा घेण्याच्या तयारीत आहे. नेपाळने नवीन शंभराची नोट छापण्याच्या निर्णय घेतला आहे. पण ही नोट छापण्याआधी त्यांनी नवीन नकाशाला मान्यता दिली आहे.

मालदीवनंतर आणखी एक शेजारी देश भारताशी पंगा घेण्याच्या तयारीत
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 5:25 PM

India-Nepal Relation : भारत आणि मालदीव यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यानंतर आणखी एक देश भारतासोबत पंगा घेण्याच्या तयारीत आहे. नेपाळेने शुक्रवारी 100 रुपयांच्या नवीन नोटा छापणार असल्याचे सांगितले आहे. ही घोषणा करत असताना त्यांनी आणखी एक घोषणा केली ती म्हणजे त्या नोटेवर तो नेपाळची नकाशा छापणार आहे. नेपाळ नोटा छापणार याबाबत भारताला कोणतीही अडचण नाही पण तो त्या नकाशात भारताचा लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी दर्शविणारा नकाशा छापणार आहे. हे भारतासाठी आक्षेपार्ह आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबत नेपाळ सरकारचे प्रवक्ते आणि माहिती व दळणवळण मंत्री रेखा शर्मा यांनी ही माहिती दिली.

नेपाळ नोटेवर छापणार नकाशा

नेपाळचा नवा नकाशा १०० रुपयांच्या नोटेमध्ये छापण्याचा निर्णय नेपाळचे अध्यक्ष यांच्यासोबतच्या बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांनी हा निर्णय घेतला आहे. नेपाळच्या या नकाशात लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी हे नेपाळमध्ये दाखवण्यात आले आहेत. पण ते भारताचा भाग आहेत.

रेखा शर्मा पुढे म्हणाल्या की, “25 एप्रिल आणि 2 मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 100 रुपयांच्या नोटेचे रीडिझाइन आणि जुना नकाशा बदलण्यास मंजुरी दिली आहे.” नेपाळच्या या निर्णयावर भारताकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. याआधी नेपाळने एकतर्फी लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुराला आपला प्रदेश म्हणून घोषित केले होते.

नेपाळने २०२० मध्ये नवा नकाशा केला अपडेट

18 जून 2020 रोजी, नेपाळने आपल्या संविधानात सुधारणा करून लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या तीन धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशांचा समावेश करून देशाचा राजकीय नकाशा अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. यावर भारताने प्रतिक्रिया दिली होती. भारताने याचे वर्णन “एकतर्फी कृती” असे केले होते. नेपाळकडून प्रादेशिक दाव्यांची ‘कृत्रिम वाढ’ टिकाऊ नसल्याचं भारताने म्हटले होते.

लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा या प्रदेशांवर भारताचे नियंत्रण आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या तिन्ही क्षेत्र भारताकडे आहेत. भारताची नेपाळशी 1850 किलोमीटरहून अधिक सीमा लागून आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि बिहार ही पाच राज्ये नेपाळच्या सीमेवर आहेत.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.