AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘1 भुजबळ पाडला तर 160 मराठे पाडू’, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा मोठा इशारा

"मराठा समाजाच्या शिंदे समितीचा जीआर रात्री अडीच वाजता काढला जातो. म्हणून रात्री-बेरात्री आमचा घात होऊ नये म्हणून आपल्याला 20 तारखेला आंदोलन सुरु करावं लागेल. रात्र वैऱ्याची आहे म्हणून सावध राहणं गरजेचं आहे", असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले.

'1 भुजबळ पाडला तर 160 मराठे पाडू', ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा मोठा इशारा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 06, 2024 | 6:31 PM
Share

पंढरपूर | 6 जानेवारी 2024 : ओबीसी नेत्यांची पंढरपुरात एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. त्याच टीकेचा धागा पकडत प्रकाश शेंडगे यांनी मोठा इशारा दिला. “तुम्ही 1 भुजबळ पाडला, तर 160 मराठे पाडू. माझं हे वाक्य गड्यांना लयी लागलं. फोन करत्यात, आमचं नाव तुमच्या यादीत आहे का? इथे सोलापूरमध्ये एक-दोन सोडले, सगळे मराठे, खासदार, आमदार सगळे मराठे, जिल्हा परिषदेला सगळे मराठे. पण आता हे चालणार नाही. आता हे चालवायचं का? आता आमदारही आपला आणि खासदारही आपलाच. करायचा ना? यापुढचा माढ्याचा खासदार हा ओबीसीचाच निवडून येणार”, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.

“काठीनं घोगडं घेऊद्या की मलाही लोकसभेत पाठवा की रं… ओबीसींचा हा एल्गार संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. मराठा समाजाने आम्हाला ओबीसीतूच आरक्षण पाहिजे, अशी भूमिका घेतली. मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे. त्यातील 10 टक्क्यांपैकी साडेआठ टक्के आरक्षण आहे. तुम्हाला हॉस्टेल मिळालं, कर्ज मिळालं, सगळं मिळालं. तरीही मुंबईत येणारच, आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. पण त्याआधी मुंबईत आम्ही जाणार. मुंबई आमची आहे. तिथे 50 लाख ओबीसी आहेत. सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये आमचे भटके-विमुक्त आहेत. त्यांनी एकदिवस रजा काढली तर मुंबई सगळी पॅक करण्याची ताकद मुंबईतील ओबीसींमध्ये आहे”, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला.

‘हे म्हणतात की, 54 लाख नोंदी सापडल्या’

“इकडे मराठा समाजाने आंदोलन जाहीर केलं. त्यानंतर आम्ही बैठक घेतली. आपलंही 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन सुरु असलं पाहिजे. आमचं म्हणणं आहे की, आमच्या आरक्षणाला धक्का लागायला नको. शासन म्हणतंय की तुम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे. आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. हे म्हणतात की, 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. या 54 लाख नोंदींच्या सगेसोयरे आणि रक्ताचे नाते धरले तर 3 ते 4 कोटी झाले. म्हणजे शंभर टक्के समाजाला कुणबी दाखले देवून ओबीसी आरक्षणात घातलं जात आहे”, असा दावा प्रकाश शेंडगे यांनी केला.

‘रात्र वैऱ्याची आहे म्हणून सावध राहणं गरजेचं’

“मराठा समाजाच्या शिंदे समितीचा जीआर रात्री अडीच वाजता काढला जातो. म्हणून रात्री-बेरात्री आमचा घात होऊ नये म्हणून आपल्याला 20 तारखेला आंदोलन सुरु करावं लागेल. रात्र वैऱ्याची आहे म्हणून सावध राहणं गरजेचं आहे. माझ्या हातील 4 जानेवारीला एक जीआर आला. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सल्लागार समितीचं नियोजन. तीन-तीन निवृत्त न्यायमूर्तींची समिती. त्यांचा पगार चार-साडेचार लाख, पाहिजे तेवढे वकील, आम्ही अर्ज केला होता. आम्हालाही वकिलांची गरज लागेल. तेव्हा त्यांना परवानगी लागते”, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.

Follow Us
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल