आम्हाला मूलभूत सुविधा पुरवता येत नसतील तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, या गावांनी केला ठराव

सीमावादावरून राजकारण ढवळून निघालं असतानाच आता अक्कलकोट तालुक्यातील काही गावांनी कर्नाटकात जाण्याची परवानगी मागितली आहे.

आम्हाला मूलभूत सुविधा पुरवता येत नसतील तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, या गावांनी केला ठराव
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Dec 05, 2022 | 7:02 PM

सोलापूर: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील चाळीस गावांवर दावा केल्यानंतर सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. त्यामुळे आता हा सीमावाद पुन्हा पु्न्हा चर्चेत येत आहे. त्यातच महाराष्ट्रातील सीमाभागातील काही गावांनी विकासाच्या मुद्यावर महाराष्ट्र सरकारलाच अल्टिमेटम देत त्यांनी कर्नाटकात जाणार असल्याचे सांगिते आहे. त्यावरूनच आता सोलापूर जिल्ह्यामधील अक्कलकोट तालुक्यातील 11 गावांनी कर्नाटकात जाण्याबाबतचा केला ठराव केला आहे.

या गावांनी हा ठराव पास करून या ठरावाची प्रत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या ठरावाची प्रत देण्यात आली आहे. त्यामुळे या गावांच्या ठरावामुळे आता हा सीमावाद पुन्हा एकदा पेटणार असल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर जिल्ह्यामधील अक्कलकोट तालुक्यातील 11 गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव पास केल्यानंतर सीमावाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ज्या अकरा गावांनी कर्नाटकात जाण्याचा परवानगी मागितली आहे. त्या गावांमध्ये विकासाच्या मुद्यावरून आता राजकारण तापले आहे.

आपल्या गावात विकासाच्या कोणत्याही गोष्टी होत नसल्यामुळे आता आम्ही कर्नाटकात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.

गावामध्ये मूलभूत सुविधा पुरवता येत नसतील तर कर्नाटकात जाण्याची परवानगी या ठरावद्वारे सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यात आली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील शेगाव, कोर्सेगाव, कांदेवाडी खुर्द, देवीकवठे, कलकर्जाळ, शावळ, शेगाव बुद्रुक, हिळ्ळी, आळगे, मंगरुळ आणि धारसंग या ग्रामपंचायतींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे कर्नाटकात जाण्याचा ठराव दिलेला आहे.

त्यामुळे आता या अकरा गावातील ठरावावर महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सीमाभागातील गावांचे लक्ष लागून राहिले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us