क्या बात है! सिकंदर शेखची जोरदार मुसंडी, थेट ‘पंजाब केसरी’ला धूळ चारली, माजी महाराष्ट्र केसरीचा पराभव

| Updated on: Jan 24, 2023 | 11:12 PM

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवी झालेला मातब्बर मल्ल सिकंदर शेख (Sikandar Shaikh) याने आज बाजी मारलीय. त्याने आज थेट पंजाब केसरी स्पर्धा विजेता पैलवान भूपेंद्र आजनाळा याला धूळ चारत 'भीमा केसरी किताब' पटकावला आहे.

क्या बात है! सिकंदर शेखची जोरदार मुसंडी, थेट ‘पंजाब केसरी’ला धूळ चारली, माजी महाराष्ट्र केसरीचा पराभव
Follow us on

सोलापूर : महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या निकालावरुन झालेला वाद ताजा असताना सोलापूर जिल्ह्यात आज लालमातीत चांगलाच धुराळा उडालेला बघायला मिळाला. विशेष म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवी झालेला मातब्बर मल्ल सिकंदर शेख (Sikandar Shaikh) याने आज बाजी मारलीय. त्याने आज थेट पंजाब केसरी स्पर्धा विजेता पैलवान भूपेंद्र आजनाळा याला धूळ चारत ‘भीमा केसरी किताब’ पटकावला आहे. या कुस्तींसाठी तब्बल 9 लाखांची बक्षिसं आहेत. विशेष म्हणजे हे बक्षिसं पटकवण्यात पैलवान महेंद्र गायकवाडचा देखील समावेश आहे. महेंद्र गायकवाड या मल्लाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपांत्य फेरीत सिकंदरचा पराभव केला होता. पण त्यावेळी पंचांनी दिलेल्या निर्णयावरुन वाद उफाळला होता. त्यानंतर हे दोन्ही पैलवान एकाच स्पर्धेत सहभागी झालेले बघायला मिळाले. पण दोघांची आपापसात कुस्ती झाली नाही.

मोहोळ तालुक्यातील टाकळी येथे भीमा साखर कारखान्याच्या ठिकाणी भीमा केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने भीमा केसरी कुस्ती स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं. कारखान्याच्या परिसरात तयार करण्यात आलेल्या कुस्तीच्या आखाड्यातच ही स्पर्धा पार पडली. विशेष म्हणजे राज्यभरातील तब्बल 400 पेक्षा जास्त पैलवानांनी या कुस्तीसाठी नाव नोंदवलं होतं.

हे सुद्धा वाचा

पैलवान सिकंदर शेखचं कमबॅक

पैलवान सिकंदर शेख आणि पंजाब केसरी भूपेंद्रसिंह अजनाला यांच्यात आज भीमा केसरी स्पर्धेच्या निमित्त लढत झाली. या लढतीत सिकंदरने बाजी मारली. सिकंदरसाठी ही लढत महत्त्वाची होती. कारण महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील उपांत्य फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण सिंकदरने न खचता अतिशय कुशाग्र बुद्धिमतेने आणि योग्य रणनीतीसोबत ताकद लावत भीमा केसरीचा गदा जिंकला.

उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडचीदेखील बाजी

विशेष म्हणजे या स्पर्धेत उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड या पैलवानाने देखील बाजी मारल्याचं पहायला मिळालं. महेंद्र गायकवाडने भीमा वाहतूक केसरी किताब पटकावला आहे.

माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखचा पराभव

भीमा साखर केसरी गदेसाठी भारत केसरी माऊली जमदाडे आणि माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांच्यात लढत झाली. ही लढत अटीतटीची झाली. पण अखेर या लढतीत बाला रफिक शेख यांचा पराभव झाला. महान भारत केसरी माऊली जमदाडे यांचा विजय झाला.

भीमा कामगार केसरी

मुंबई महापौर केससी गणेश जगताप आणि पैलवान अक्षय शिंदे यांच्यात भीमा कामगार केसरीची लढत झाली.