मोठी बातमी! पंढरपुरात ‘या’ काळात दारुबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

| Updated on: Nov 01, 2022 | 7:51 PM

सोलापूर जिल्हाधिकऱ्यांनी दारु विक्रीबद्दल मोठा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! पंढरपुरात या काळात दारुबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

सोलापूर : कार्तिक एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर शहर पुन्हा एकदा झगमगताना दिसणार आहे. लाखो भाविक पुन्हा एकदा कार्तिक एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला दाखल होणार आहेत. भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन चांगलंच कामाला लागलं आहे. भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, यासाठी काळजी घेतली जात आहे. तसेच गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने याच पार्श्वभूमी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर शहरात कार्तिक यात्रेदरम्यान मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाचा हा खरंतर मोठा निर्णय मानला जातोय.

कार्तिक यात्रेनिमित्त पंढरपूरमध्ये मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक शांतता राहावी यासाठी 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी पंढरपूर शहरात मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कार्तिक एकादशीच्या निमित्ताने शहरातील सर्व मद्य दुकानं 3 आणि 4 नोव्हेंबरला बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

आषाढी आणि कार्तिक एकादशीला पंढरपूरला एक वेगळंच वातावरण असतं. कोरोना संकट काळात लाखो वारकऱ्यांना आपल्या विठुमाऊलीचं प्रत्यक्ष दर्शन घेता आलं नव्हतं. पण आता कोरोना परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. त्यामुळे लाखो भाविकांची पावलं आता पंढरपुराच्या दिशेला जात आहेत. राज्यभरातून भाविकांच्या शेकडो दिंड्या आता पंढरपुरात दाखल होत आहेत. या भक्तीमय वातावरणावर कोणतीही अनुचित घटना घडू नये, शांततेचा भंग होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.