AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anjangaon Statue Controversy: माढा तालुक्यातील अंजणगावमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव, प्राध्यापक हाकेंचा ठिय्या, अपडेट काय?

Anjangaon Statue Controversy: राज्यात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून वाद झाल्याच्या घटना घडल्या. त्यात आता माढा तालुक्यातील अंजनगावची भर पडली आहे. तर येथील वादात प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ठिय्या दिल्याने वातावरण पांगले. काय आहे अपडेट?

Anjangaon Statue Controversy: माढा तालुक्यातील अंजणगावमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव, प्राध्यापक हाकेंचा ठिय्या, अपडेट काय?
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव
| Edited By: | Updated on: Apr 03, 2026 | 2:51 PM
Share

Anjangaon Statue Controversy: सोलापूरच्या माढ्यातील अंजनगावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद उद्भवला आहे. या परिसरात पोलिसांकडून बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. 2 गट आमनेसामने दिसून आले. पुतळा शासकीय जागेत स्थलांतरीत होईपर्यत ठिय्या देणार असल्याची हाक प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. हाके यांना गावातून हाकला अशा घोषणा सुरू झाल्यानंतर वाद पेटला. पोलिसांनी बाहेरून गावातील लोकांना गावात येऊ देऊ नये अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणा देण्यात आल्या. कालचा अनुभव लक्षात घेता आज मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला.

प्राध्यापक लक्ष्मण हाके आक्रमक

माढा तालुक्यातील अंजन गावात आंदोलनाला बसलेले लक्ष्मण हाके आक्रमक झालेले दिसले. आंदोलन स्थळावरून उठून लक्ष्मण हाके बॅरिगेटिंगच्या दिशेने धावले. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आंदोलकांची समजूत घालत आहेत. पुतळ्याचा वाद वाढल्यानंतर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी कोर्टात जाण्याचे ठरवले. त्यांची एका गटासोबत बैठक पडली आहे. मोजणी करुन जर गट नंबर ८१४ देवस्थानच्या 45 गुठ्ठे क्षेत्राच्या जागेतजर पुतळा येत असेल तर पुतळा काढून घेण्याचा माजी आमदार राजन पाटील यांचा गटाला निर्णय दिला. एका गटाने निर्णयाला संमंती दिली. दुसर्‍या गटाचा निर्णय थोड्याच वेळात समोर येणार आहे. लक्ष्मण हाके यांच्यामुळे गावात जातीयवाद वाढत चालला आहे. हाके यांना गावातून बाहेर काढण्याची मागणी एका गटाच्या कार्यकर्त्यानी केली. तर पुतळ्याला आमचा विरोध नाही. पण महाराजांचा पुतला हा योग्य ठिकाणी बसावा अशी मागणी हाके यांनी केली.

बाहेरील नागरिकांना गावात येण्यास मज्जाव

अंजनगावात इतर गावातील नागरिकांना प्रवेश करण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला. गावामध्ये येणार्‍या दोन्ही बाजूला पोलिसांनी बॅरिगेटिंग करून प्रवेश रोखला आहे. बाहेरील नागरिकांना गावात प्रवेश देणार नसल्याची पोलिसांची भूमिका आहे. पोलीस बाहेरील लोकांना गावात येऊ देत नसल्याने दोन्ही गट आक्रमक झाले आहेत. प्रशासनाचे कर्मचारी काल रात्री 12 वाजता मोजणीसाठी आले होते. मात्र आम्ही ती मोजणी होऊ दिली नाही. होऊ देणार नाही – ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भूमिका घेतली आहे. अंजनगाव खेलोबा देवस्थानच्या प्रवेशद्वारावर हा पुतळा उभारला आहे. त्यामुळे जोपर्यंत पुतळा शासकीय जागेत स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आमदार अभिजीत पाटलांनी माढा तालुक्यातील 12 ठिकाणी पुतळे बसवण्यासाठी पैसे दिले आहेत. आमच्या देवाच्या जागेची मोजणी आम्ही होऊ देणार नाही, अशी भूमिका हाके यांनी घेतली.

Follow Us
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त