AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anjali Damania: भोंदू खरातला कुणाचे सर्वाधिक फोन? त्या नावाने राज्याच्या राजकारणात महाभूकंप! अंजली दमानियांनी कच्चा चिठ्ठाच बाहेर काढला

Anjali Damania on Ashok Kharat: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंजाबमधील चंदीगड येथून राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला. त्यांनी भोंदू अशोक खरातच्या सीडीआरची प्रतच बाहेर आणली. त्यात कोणी कोणी खरातला सर्वाधिक वेळा फोन केला याची कुंडलीच बाहेर काढली. त्या नावाने राज्याच्या राजकारणात महाभूकंप आला.

Anjali Damania: भोंदू खरातला कुणाचे सर्वाधिक फोन? त्या नावाने राज्याच्या राजकारणात महाभूकंप! अंजली दमानियांनी कच्चा चिठ्ठाच बाहेर काढला
अंजली दमानिया, अशोक खरातImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 03, 2026 | 2:04 PM
Share

Anjali Damania on Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातच्या राजकीय कनेक्शनने मोठी उलथापालथ झाली आहे. अजून एकही राजकीय बळी गेला नसला तरी खरातचे सिंडिकेट मोठे असल्याचे तपासात समोर आले आहे. काही नेतेमंडळींची नावे समोर आली आहेत. त्यांचे खरात सोबतचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. पण प्रत्येक जण आपला आणि त्याचा कोणताही संबंध नसल्याचा दावा करत आहेत. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा बॉम्ब टाकला आहे. भोंदू खरातला कुणाचे सर्वाधिक फोन कॉल झाले, कोणत्या नेत्याशी तो कितीवेळ बोलला. त्याने कोणत्या नेत्याला कितीदा फोन केले. तर त्याला कोणत्या नेत्याने कितीवेळा फोन केला. दोघांमध्ये कितीवेळा बोलणे झाले याची इत्यंभूत माहिती अंजली दमानिया यांनी बाहेर आणली. त्यांनी कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) जाहीर केला आहे. एका लग्न समारंभानिमित्त त्या चंदीगडला आहेत. त्यांनी याविषयीची माहिती समाज माध्यमावर व्हिडिओ शेअर करून दिली.

रुपाली चाकणकर आणि बहिणीने किती केले कॉल

रुपाली चाकणकरच नाही तर अनेक नेत्यांनी अशोक खरात याला कॉल केले, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जाहीर केले. रूपाली चाकणकर यांनी एकूण 177 कॉल खरातला केले आहेत. यामध्ये दोघांमध्ये 33 हजार 727 सेकंदाचे संभाषण झाले.

तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांनी भोंदू खरातला 236 कॉल केले आहेत

तर राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे सतरा कॉल आहेत. एकनाथ शिंदे यांचे सर्वात जास्त संभाषण 21 मिनिटांचे आहेत. या 17 कॉल्समध्ये 10 इनकमिंग, 7 आऊटगोईंग कॉल्स झाले आहेत.

अशा व्यक्तीसोबत एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल झाले आहेत तर ते कशा संदर्भात झाले आहेत ते त्यांनी सांगणं गरजेचं आहे असे दमानिया यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे यांचे प्रत्येकी 8 कॉल आहेत

हे सगळे नॉर्मल कॉल आहेत व्हॉट्सॲपबद्दल माहिती नाही, व्हॉट्सॲपची माहिती मिळत नसते, असे दमानिया म्हणाल्या

रुपाली चाकणकरांवर पुन्हा निशाणा

अनेक माहिती या संस्था पुढे येत असतात असतात पण सर्वसामान्य जनतेपुढे पण ती माहिती यायला हवी म्हणून मी हे सर्व काही सांगत आहे. आता समजा पाहायला गेलं तर सर्वाधिक संपर्क कोणासोबत झाला आहे तर तो कुटुंबातील सदस्या वा जवळच्या व्यक्ती सोबत आहे आणि त्यानंतर रूपाली चाकणकर यांच्यासोबत आहे. 33 हजार पेक्षा जास्त सेकंद रूपाली चाकणकर यांच्यासोबत सोबत बोलणं झालं आहे, असा निशाणा अंजली दमानिया यांनी साधला.

Follow Us
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...