ST Strike| आंदोलन दडपणे सुरू, 40 कर्मचाऱ्यांना डांबले, हिंसक वळण लागेल; भाजप नेते दरेकरांचा सरकारला इशारा

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी गेल्या तीन आठवड्यांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. जवपास 10 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह आझाद मैदानावर ठिय्या दिला आहे.

ST Strike| आंदोलन दडपणे सुरू, 40 कर्मचाऱ्यांना डांबले, हिंसक वळण लागेल; भाजप नेते दरेकरांचा सरकारला इशारा
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद.
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 1:06 PM

मुंबईः राज्यभर सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. यवतमाळ, इगतपुरीसह इतर ठिकाणांहून चार बस मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत होत्या. मात्र, या कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले आहे. त्यामुळे शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळक लागेल. याची जबाबदारी सर्वस्वी सरकारवर राहील, असा इशारा रविवारी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये एसटी संपामुळे टीईटी परीक्षा देणाऱ्या अनेक उमेदवारांचे पेपर हुकले. ते परीक्षा केंद्रावर उशिरा पोहचल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळाला.

दरेकर आक्रमक

भाजप नेते प्रवीण दरेकर रविवारी आक्रमक झालेले दिसले. दरेकर म्हणाले की, सरकार एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दडपण्याचे काम करत आहे. यवतमाळ व अन्य ठिकाणाहून चार बसेस मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत होत्या. मात्र, त्यांना इगतपुरी येथे अडवून ठेवले आहे. त्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल हिसकावून घेतले आहेत. प्रशासनाने 40 कर्मचा-यांना तेथेच डांबून ठेवले आहे. कर्मचारी शांततापूर्ण वातावरणात आंदोलन करत आहेत. परंतु जर सरकार आंदोलन दडपत असेल, तर त्या आंदोलनाला हिंसक वळण लागेल. जर आंदोलन हिंसक झाले, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा दरेकर यांनी दिला. तसेच सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला.

मनमाडच्या 21 कर्मचाऱ्यांना अडवले

मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनमाड येथून 21 एसटी कर्मचारी निघाले होते. मात्र, त्यांना मनमाड पोलिसांनी अडवून ताब्यात घेतल्याचे समजते. मनमाड येथून पंचवटी एक्स्प्रेसने हे आंदोलन मुंबईकडे निघाले होते. त्यांना मनमाड रेल्वेस्थानकाबाहेर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. मागण्या मान्य करेपर्यंत कामावर रुजू होणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. संपाची कोंडी फुटत नसल्याने सर्वसामान्यांची प्रचंड फरपट सुरू आहे.

10 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचा ठिय्या

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी गेल्या तीन आठवड्यांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. जवपास 10 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह आझाद मैदानावर ठिय्या दिला आहे. त्यात एसटीच्या खासगीकरणाची सुरू झालेली चर्चा. नाशिकमधल्या पेठ आगारातील कर्मचाऱ्याने कमी पगारामुळे केलेला आत्महत्या. या साऱ्या घटनांमुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संताप वाढला आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील अनेक कर्मचारी मुंबईला येत आहेत. मात्र, त्यांना ठिकठिकाणी अडवण्यात येत आहे.

इतर बातम्याः

ST Strike| नाशिकमध्ये एसटी संपाचा TETच्या परीक्षार्थींना फटका; उशिरा पोहचल्यामुळे पेपर हुकला, विद्यार्थ्यांचा गोंधळ

Nashik: विद्या असूनही मती गेली, डॉक्टर नववधूच्या Virginity Testचा प्रयत्न, वर मर्चंट नेव्हीमध्ये!