मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक..

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वीच दिल्ली दाैऱ्यावर होते. आताही ते दिल्लीच्या दाैऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांचा अचानक हा दिल्ली दाैरा रद्द करण्यात आला. काल एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड पोहोचले होते.

मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक..
Eknath Shinde
| Updated on: Jul 17, 2026 | 1:16 PM

राज्यात अर्थखात्याहून मोठे घमासान सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट अर्थखात्यासाठी आग्रही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याबाबत ते भेट घेणार आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थखाते देण्यास एकनाथ शिंदे यांचा विरोध असल्याचे कळतंय. दिल्ली भेटीमध्ये त्यांनी अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटीत अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचा विरोध केला, अशी माहिती आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखाते आपल्याकडेच ठेवले. मात्र, जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीनंतर आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी होणार यानंतर शरद पवारांच्या पक्षाकडे अर्थखाते जाणार अशी जोरदार चर्चा आहे. यामध्ये महायुतीमध्ये अर्थखात्याहून एक घमासान सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसाचे नेते आणि सुनेत्रा पवार याच मुद्द्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

यादरम्यानच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांचा हा दिल्ली दाैरा अचानक रद्द करण्यात आला. 11 वाजता एकनाथ शिंदे महाराष्ट्र सदन इथल्या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावणार आहेत. त्यांचा दिल्ली दाैरा नक्की का रद्द झाला, याबाबत काही माहिती मिळू शकली नाहीये. दोन दिवसांच्या दिल्ली दाैऱ्यावर एकनाथ शिंदे होते.

काल एकनाथ शिंदे यांची जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली. ज्यानंंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या. एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड पोहोचले होते, त्यावेळी त्यांच्यात नक्की काय चर्चा झाली, याबाबत काही माहिती ही मिळू शकली नाहीये.

आज एकनाथ शिंदे नंदनवन या ठिकाणी महायुतीच्या काही वरिष्ठ नेत्यांची चर्चा करणार असल्याची माहिती मिळतंय. अर्थखात्याच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अधिक महत्वप्राप्त झाले. शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय. त्यातच या भेटीगाठी अधिक वाढल्याचेही बघायला मिळत आहे. दुसरीकडे अजित पवार गटही अर्थखात्यासाठी आग्रही आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us