सूर्यकुमार यादव याने खरेदी केले आलिशान पेंटहाऊस, शाहरुख खानच्या पत्नीने गौरी खानने केले डिझाईन
क्रिकेटस्टार सुर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी या दाम्पत्याने दुबईतील शाहरुखज बाय डेन्यूब मध्ये आपले पहिले घर खरेदी केले आहे. या लक्झरीयस घराची खासियत म्हणजे शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हीने हे डिझाईन केले आहे.

Dubai Maritime City - house - Suryakumar and Devisha
भारतीय क्रिकेटर सूर्यकुमार यादव याने दुबईत अलिकडे आपले पहिले घर खरेदी करुन एक नवीन सुरुवात केली आहे. पत्नी देविशा शेट्टी हिच्या सोबत त्याने दुबईतील एका लक्झरी प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केली आहे. या प्रोजेक्टची खास बाब म्हणजे या प्रोजेक्टचे नावच बॉलीवुड सुपरस्टार शाहरुख खान याच्या नावावर ठेवले आहे. या पेंटहाऊसला शाहरुखची आर्किटेक्ट पत्नी गौरी खान हीने डिझाईन केले आहे. सुर्यकुमार याने सोशल मीडियावर या संदर्भात माहिती दिली आहे.
Follow Us
