वर्ध्यात पोलिसांच्या वाहनावर दगडफेक, दुकानदारांवर गुन्हे

  • Updated On - 5:02 pm, Fri, 5 July 19 Edited By:
वर्ध्यात पोलिसांच्या वाहनावर दगडफेक, दुकानदारांवर गुन्हे

चेतन व्यास, टीव्ही 9 मराठी, वर्धा : दिवाळीच्या दिवशी वर्ध्यातील पुलगाव शहराच्या हार्डवेयर दुकानाला भीषण आग लागली. यामध्ये पाच दुकाने जळून खाक झाली. आगीची माहिती मिळाल्यानंतरही पोलीस आणि अग्निशामक दल हे एक तास उशिरा पोहोचले. त्यामुळे आगीचे लोळ वाढत गेले, असा स्थानिकांचा आरोप आहे.

यानंतर संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. यात घटनेच्या तीन दिवसानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मात्र यात दोषींना सोडत ज्या व्यापाऱ्यांची दुकाने जळाली, अशा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहराच्या व्यापाऱ्यांमध्ये रोष असून शहरात पोलिसांप्रति नाराजीचा सूर आहे.

पाहा व्हिडीओ :