मुंबईत कोणत्या प्राण्याची दहशत वाढली? दोन वर्षात सव्वा लाख मुंबईकरांना चावा कुणी घेतला?

मुंबई महानगर पालिकेकडून याबाबत विशेष मोहीम हाती घेतली जाते, निर्बिजीकरण करण्यासाठी लाखों रुपयांचा निधीही खर्च केला जातो.

मुंबईत कोणत्या प्राण्याची दहशत वाढली? दोन वर्षात सव्वा लाख मुंबईकरांना चावा कुणी घेतला?
Image Credit source: Google
| Updated on: Jan 31, 2023 | 9:42 AM

गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मुंबईकरांची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुंबईत भटक्या कुत्र्यांची दहशत वाढतच चालली आहे. दोन वर्षात सव्वा लाख मुंबईकरांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समोर आले आहे. यामध्ये मुंबईत भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे समोर आले आहे. यामध्ये पालिकेकडून खरोखर निर्बिजीकरणकेले जाते का? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे मुंबईत चावा घेणाऱ्या घटनांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे मुंबईकरांना चावा घेणारी आकडेवारीही चक्रावून टाकणारी आहे. दोन वर्षातच सव्वा लाख मुंबईकरांना चावा घेतल्याची बाब समोर आल्याने मुंबईत भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

खरं म्हणजे भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी निर्बिजीकरणाची प्रक्रिया केली जाते, त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होण्यास मदत होते.

मुंबई महानगर पालिकेकडून याबाबत विशेष मोहीम हाती घेतली जाते, निर्बिजीकरण करण्यासाठी लाखों रुपयांचा निधीही खर्च केला जातो. मात्र, भटक्या कुत्र्यांची संख्या काही केल्या कमी होत नाही.

मागील दोन वर्षात भटक्या कुत्र्यांनी मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात चावा घेतल्याच्या घटनेची नोंद झाली आहे, एक लाख 12 हजार 769 व्यक्तींना चावा घेतल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, 2014 पासून मागील वर्षाअखेर तीन लाख 88 हजाराहून अधिक कुत्र्यांचे निर्बिजीकरणही करण्यात आले आहे. तरी देखील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे.

कुत्र्यांची केलेली जनगणना बघता जवळपास तीन लाख आहे. याच तीन लाख कुत्र्यांनी मुंबईत मोठा उपद्रव केला असून वाढती संख्या रोखण्यासाठी पालिकेने जोरदार मोहीम हाती घेतली आहे.

निर्बिजीकरण करण्यासाठी पालिकेने खास डॉग व्हॅन तयार केली आहे. मुलुंड, मालाड, महालक्ष्मी आणि वांद्रे परिसरात या डॉग व्हॅन उभ्या असतात, कुत्र्यांवर उपचार करत असतात.