Sharad Pawar resigns | ‘सर्वात चांगला पर्याय म्हणजे स्वतःहून निवृत्त होणं…’ सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

'शरद पवार यांचं निवृत्तीचं कारण...', शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

Sharad Pawar resigns | सर्वात चांगला पर्याय म्हणजे स्वतःहून निवृत्त होणं... सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
| Updated on: May 02, 2023 | 3:41 PM

मुंबई : ‘सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर यांच्यामध्ये बघितलं एक तर आपण स्वतःहून निवृत्त व्हायचं असतं अन्यथा जनता आपल्याला निवृत्त करत असते. त्यामुळे सर्वात चांगला पर्याय म्हणजे स्वतःहून निवृत्त होणं.’ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या दरम्यान शरद पवार यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घोषित केला आहे. शरद पवार यांच्या निर्णयानंतर अनेक मंत्री आणि कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आहे.

शरद पवार यांनी निवृ्त्तीची घोषणा केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘निवृत्तीचे काय संकेत दिले याबद्दलची माहिती नाही. आपल्याच माध्यमातून कळालं. राज्यसभेमध्ये तीन वर्षाचा कालावधी आहे राज्यसभेचा कालावधी संपल्यानंतर लोकसभा राज्यसभा संसदीय कामकाजामध्ये सहभागी होणार नाही अशी स्पष्टता त्यांनी दिली.’

‘राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते कधी निवृत होणार आहे याची मला माहिती नाही. पण राष्ट्रवादी पक्षाचा जो काही कारभार आहे. तो ज्येष्ठ राष्ट्रवादी नेत्यांची एक समिती करून साधारणतः सोपायचा विचार करत आहेत. क्रिकेटमध्ये अतिशय उंचीवर गेल्यावर अचानक निवृत्तीची घोषणा केल्यानंतर हाच भाव असतो.’ असं देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले

सुधीर मुनगंटीवार म्हणाले पुढे म्हणाले, ‘सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर यांच्यामध्ये बघितलं. एक तर आपण स्वतःहून निवृत्त व्हायचं असतं अन्यथा जनता आपल्याला निवृत्त करत असते.. त्यामुळे सर्वात चांगला पर्याय म्हणजे स्वतःहून निवृत्त होणं. जनता जेव्हा निवृत्त करते तेव्हा मनात एक भाव असतो की, आम्ही जनतेसाठी इतके वर्ष सेवा दिली पण जनता त्या सेवेची किंमत करत नाही. लोक निश्चित याचं अनुकरण करतील…’

‘भविष्यात अनेकांनी एका विशिष्ट कालावधीनंतर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरे, नानाजी देशमुख यांसारखे अनेक नेते पाहिले ज्यांनी स्वतः हून निवृत्ती पत्कारली. शरद पवार यांचं निवृत्तीचं हेच कारण असावं..’ असं देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

शरद पवार यांनी निर्णय घोषित केल्यानंतर निर्णय मागे घ्या, अशी घोषणाबाजी देखील कार्यकर्त्यांना केली. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या घोषणेनंतर समिती ठरवेल ते शरद पवार यांना मान्य असेल… असं अजित पवार म्हणाले.