AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar resigns | ‘घाणेरडे आरोप… प्रत्यारोप…’, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेवर संजय राऊत यांचं ट्विट

'बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा दिला. शरद पवार यांनी देखील...' शिवसेनेचे खासदार (ठाकरे गट) संजय राऊत याचं शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेवर ट्विट....

Sharad Pawar resigns | 'घाणेरडे आरोप... प्रत्यारोप...', शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेवर संजय राऊत यांचं ट्विट
| Updated on: May 02, 2023 | 2:35 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या दरम्यान शरद पवार यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घोषित केला आहे. शरद पवार यांनी निर्णय घोषित केल्यानंतर निर्णय मागे घ्या, अशी घोषणाबाजी देखील कार्यकर्त्यांना केली. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या घोषणेनंतर समिती ठरवेल ते शरद पवार यांना मान्य असेल… असं अजित पवार म्हणाले. आता यावर शिवसेनेचे खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. सध्या संजय राऊत यांचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

संजय राऊत ट्विट करत म्हणाले, ‘एक वेळ आली… घाणेरडे आरोप.. प्रत्यारोप… राजकारणाचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी तेच केलं आहे… जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला… शरद पवार हे देशाच्या राजकारणाने आणि समाजकारणाचे श्वास आहेत…’ सध्या संजय राऊत यांचं ट्विट तुफान चर्चेत आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल, असे हे धक्कादायक खुलासे आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या. त्याचवेळी धक्कादायक निर्णय जाहीर केला. आपण अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. यावेळी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या.

काय म्हणाले अजित पवार? ‘तुमच्या भावना साहेबांना कळाल्या आहेत. समिती ठरवेल ते शरद पवार यांना मान्य असेल. कमिटी म्हणजे मोठी लोकं नाहीत. परिवारातील सदस्य असतील. मी असेल सुप्रिया सुळे असतील.. तुम्ही भावनिक साथ जी साहेबांना घातली, ती आमच्या लक्षात आली आहे. पण तुम्ही काही अडचण लक्षात घ्या.. कमिटी तुमच्या मनातील योग्य निर्णय घेईल. एवढीच खात्री मी तुम्हाला या निमित्ताने देतो… असं अजित पवार म्हणाले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?