NCP विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान सुनेत्रा पवार अन् CM फडणवीसांची 2 तास बैठक, काय चर्चा झाली?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेमुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्वाची बैठक झाली.

NCP विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान सुनेत्रा पवार अन् CM फडणवीसांची 2 तास बैठक, काय चर्चा झाली?
Mahayuti
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 14, 2026 | 1:35 PM

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून सुनील तटकरे यांच्यासहित इतर नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. अजितदादांसोबतच्या बैठकीत विलीनीकरणाचं तारीख ठरल्याचं सांगण्यात आलं आहे. या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या.दोन्ही नेत्यांमध्ये जळपास दोन तास चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

भेटीत काय चर्चा झाली? 

Loading...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास पावणे दोन तास चर्चा झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जवळपास 11 वाजता मुख्यमंत्र्‍यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचल्या.  त्यानंतर झालेल्या बैठकीत पहिल्यांदा महाजेनको संदर्भात बैठक झाली. ऊर्जा विभागाबाबत ही बैठक होती.  अनेक सूचना या बैठकीत देण्यात आल्या. या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरूनही चर्चा झाल्याचे सांगण्यात आलं आहे.

कोणती राष्ट्रवादी ही कोणत्या राष्ट्रवादीत विलीन होणार, याचा एक आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून घेण्यात आला. सुनेत्रा पवार गटातील नेते हे शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय. 22 ते 26 आमदार हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकी संख्या महायुतीसाठी चिंताजनक मानली जात आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कानोसा घेतल्याचे बोलले जात आहे. सर्व आमदारांची भूमिका काय आहे, तसेच काही सूचना फडणवीसांनी दिल्याचे सांगितलं जात आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला आमचा विरोध नाही, अशी भावना त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us