वेळ येऊ द्या मग….’गुंगी गुडिया’ उल्लेखावर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिकिया, एका वाक्यात विषय संपवला!

सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख केल्यामुळे चांगलंच राजकारण तापलं आहे. राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारची टिप्पणी करणे हा अश्लाघ्यपणा आहे, असा हल्लाबोल सत्ताधाऱ्यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर काँग्रेसने सुनेत्रा पवार यांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केलीय.

वेळ येऊ द्या मग....गुंगी गुडिया उल्लेखावर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिकिया, एका वाक्यात विषय संपवला!
sunetra pawar and congress and harshwardhan sapkal
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 04, 2026 | 7:50 PM

Suntra Pawar : काँग्रेसच्या पक्षाने सोशल मीडिया खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख करण्यात आला आहे. याच गुंगी गुडिया उल्लेखामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. सोबतच आमच्या नेत्यावर अशी टीका केली जात असेल तर आम्ही भविष्यात गप्प राहणार नाही, असा इशाराच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिलाय. या सर्व घडामोडी घडत असताना गुंगी गुडिया उल्लेखावर सुनेत्रा पवार यांचे मत काय? असे विचारले जात होते. आता खुद्द त्यांनीच यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

काहीही झालं तरी माफी मागणार नाही

सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख केल्यामुळे चांगलंच राजकारण तापलं आहे. राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारची टिप्पणी करणे हा अश्लाघ्यपणा आहे, असा हल्लाबोल सत्ताधाऱ्यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर काँग्रेसने सुनेत्रा पवार यांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केलीय. दुसरीकडे काँग्रेस पक्ष मात्र आपल्या त्या विधानावर ठाम आहे. काहीही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही. आम्ही आमच्या विधानावर ठाम आहोत, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनीही आम्ही कोणतीही अश्लाघ्या टीका केलेली नाही, असं म्हणत आपली माघार घेण्यास नकार दिला आहे.

सुनेत्रा पवार नेमकं काय म्हणाल्या?

दरम्यान, काँग्रेसच्या या गुंगी गुडिया या विधानानंतर सर्वत राजकीय वातावरण तापलेले असताना शेवटी सुनेत्रा पवार यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलंय. त्यांनी अवघ्या एका वाक्यात विषय संपवला आहे. वेळ येऊद्या मग मी बोलते, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.  त्यामुळेच आता सुनेत्रा पवार भविष्यात नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us