AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar : बारामतीची धुरा सुनेत्रा पवारांकडे, अजित दादांच्या जाण्यानंतर घेतला मोठा निर्णय

Sunetra Pawar Baramati: अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतर अख्ख्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली. बारामतीत तर लोकांना अश्रू अनावर झाले. आता याच बारामतीची धुरा सांभाळण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यांवर येणार आहे.

Sunetra Pawar : बारामतीची धुरा सुनेत्रा पवारांकडे, अजित दादांच्या जाण्यानंतर घेतला मोठा निर्णय
सुनेत्रा पवारImage Credit source: social media
| Updated on: Feb 25, 2026 | 10:28 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे गेल्या महिन्यात विमान अपघातात निधन झालं. 28 जानेवारीला बारामतीजवळ त्याचं विमान क्रॅश झालं आणि त्यात अजित दादांसह 5 जणांना जीव गमवावा लागला. त्यांच्या निधनाने अख्खा महाराष्ट्र हळहळला, बारामतीत तर प्रत्येकाच्या डोळ्यांतील अश्रूंना खळ नव्हता. दरम्यान अजित पवार यांच्या अकस्मात निधनामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली असून त्याच्या पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगातर्फे सुरू करण्यात आली आहे. याचसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या बारामती पोटनिवडणूक लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये ही पोटनिवडणूक लढण्यावर एकमत झालं आहे. बारामती विधानसभेची प्रारून  मतदारयादी 10 मार्चला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ही निवडणूक बिनविरोध करण्यावर भर असेल.

सुनेत्रा पवारांकडे बारामतीची धुरा

विमान अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर बारामती विधासभेची पोटनिवडणूक होणार आहे. या निवडमुकीमध्ये आता राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार याच उमेदवार असणार आहेत. यासंदर्भातील चर्चा राष्ट्रवादील काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही झाली. त्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता बारामतीची धुरा ही सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर असणार आहे.विधासभेची पोटनिवडणूक त्या लढताना दिसतील.

पार्थ पवार राज्यसभेवर  ?

राज्यसभेच्या निवडणुकाही आगामी काळात होणार असून या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून पार्थ पवार (Parth Pawar)  यांचं नाव निश्चित झाल्याचं समजतंय. नुकतीच पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठक झाली, त्यात हा निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

ही बातमी अपडेट होत आहे. 

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?