5000 रुपयांची अग्रीम रक्कम अपुरी, शेतकऱ्यांत नाराजी, तटकरे फडणवीसांना भेटून…लवकरच मोठा निर्णय होणार?

संवेदनशील असलेल्या सरकारने शेतकऱ्यांना 5000 रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुष्काळाच्या संदर्भात ज्या-ज्या उपायोजना करायच्या आहेत, त्या केल्या जातील, असे तटकरे म्हणाले.

5000 रुपयांची अग्रीम रक्कम अपुरी, शेतकऱ्यांत नाराजी, तटकरे फडणवीसांना भेटून...लवकरच मोठा निर्णय होणार?
sunil tatkare and devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2026 | 8:20 PM

Maharashtra Drought Update : राज्यात सध्या दुष्काळ आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती चांगलीच बिकट झाली आहे. शेतातील पीक करपून गेल्याने त्यांना आर्थिक मदत गरजेची आहे. शेतकऱ्यांची ही स्थिती लक्षात घेऊनच सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर 5000 रुपये अग्रीम मदत देण्याची घोषणा केली आहे. परंतु याच घोषणानंतर आता विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांची ही थट्टा आहे. 5000 रुपयांत काहीही होणार नाही. मदतीची ही रक्कम वाढवावी अशी मागणी केली जात आहे. यावरच आता सत्ताधारी राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीय. शेतकऱ्यांना दिली जाणारी अग्रीम मदत तुटपुंजी आहे. याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, अशी महत्त्वाची माहिती तटकरे यांनी दिलीय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

सुनील तटकरे यांनी माध्यम प्रतिनिधीना प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अग्रीम मदतीवर महत्त्वाचं विधान केलं. “शेतकऱ्यांनी अग्रीम मदतीबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ही मदत अपुरी असल्याची भावना शेतकऱ्यांची आहे. मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु माझं त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही,” अशी माहिती त्यांनी दिली.

Loading...

सुरुवातीला दिली जाणारी मदत ही अपुरी आहे

तसेच, संवेदनशील असलेल्या सरकारने शेतकऱ्यांना 5000 रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुष्काळाच्या संदर्भात ज्या-ज्या उपायोजना करायच्या आहेत, त्या केल्या जातील. पण सुरुवातीला दिली जाणारी मदत ही अपुरी आहे. शेतकऱ्यांची ही भावना मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

1972 सालच्या दुष्काळाची काढली आठवण

मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मी 1972 सालचा दुष्काळ पाहिलेला आहे. त्या काळात अन्नधान्याची टंचाई होती. यावेळी पाण्याची टंचाई आहे. अशा वेळी महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत केंद्राने केली पाहिजे, अशी विनंती मी मोदी यांना केली आहे, अशी माहिती त्यांमनी दिली.

दरम्यान, तटकरे मुख्यमंत्री फडणवीस यांना नेमकं काय सांगणार? तसेच सरकार या अग्रीम मदतीत वाढ करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us