मीही राष्ट्रवादीत काम केलंय, बरंच काही बोलू शकतो; शिंदेसेनेच्या मंत्र्याचा सुनील तटकरेंना सूचक इशारा, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी आपली आधीची भूमिका बदलत अजित पवार असते तर १२ फेब्रुवारी रोजीच दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते असा दावा केला आहे. यावरुन शिवसेनेच्या नेत्याने त्यांच्यावर तोंडसुख घेतले आहे.

मीही राष्ट्रवादीत काम केलंय, बरंच काही बोलू शकतो; शिंदेसेनेच्या मंत्र्याचा सुनील तटकरेंना सूचक इशारा, म्हणाले...
sunil tatkare
| Updated on: Nov 13, 2026 | 11:22 PM

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात सुनील तटकरे आणि उदय सामंत यांच्यात वाद सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सुनील तटकरे यांनी दावा केला होता की, अजित पवार असते तर १२ फेब्रुवारी रोजीच दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते. यावर दोन महिन्यांपूर्वी सुनील तटकरे विलीनीकरण होणार नाही असे सांगत होते आणि आता १२ फेब्रुवारीला विलीनीकरण होणार असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या या संभ्रमात मी आणि संपूर्ण महाराष्ट्र आहे अशी टीका उदय सामंत यांनी केली होती.यावर सुनील तटकरे यांनी उदय सामंत हे माझे एकेकाळचे सहकारी होते आणि त्यांना मंत्री करण्यात आमचाही थोडा वाटा होता.आमचा पक्ष वेगळा असून, त्यांनी आमच्या पक्षाबद्दल बोलण्याची त्यांना गरज नाही अशी टीका केली होती. आता त्यावर पुन्हा एकदा उदय सामंत यांनी उत्तर दिले आहे.

Loading...

राष्ट्रवादीबाबत जो संभ्रम जनतेत आहे, तो जनता आम्हाला महाराष्ट्रात फिरताना सांगते. दोन्ही राष्ट्रवादींमध्ये कोण-कोणात मर्ज व्हायचं हा त्यांचा प्रश्न आहे. यावर पत्रकारांनी मला प्रश्न विचारल्यावर मी म्हणालो की मलाही संभ्रम आहे, संभ्रम दुर करावा असं मी म्हंटलं असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की मला कोणीही मोठं केलं नाही, तर शरद पवारांनी मला पहिल्यांदा तिकीट दिलं. अजित पवार पाठिशी ठामपणे उभे राहिले, मगच मी आमदार झालो, राजकारणात आलो. साल २०२४ ला मी राष्ट्रवादी सोडली. माझ्या पहिल्या तिकीटाचे अनेक पैलू आहे आणि सर्व जपून ठेवल्यात त्या गोष्टी असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

 

खरंतर तटकरे यांना चिडण्याचे काहीच कारण नव्हतं. पत्रकारांनी जो प्रश्न विचारला त्याला मी उत्तर देत होतो.आम्ही पण एनसीपीमध्ये काम केले आहे. एनसीपीबद्दल मी पण बरंच काय बोलू शकतो पण मला बोलायचं नाही. मी काय बोलावं याचं व्यक्तीस्वातंत्र्य मला आहे. मला कुणीही मोठा केला नाही, मला राष्ट्रवादी पक्षाचे शरदचंद्र पवार यांनी पक्षाचे तिकीट दिले. अजित पवार ठामपणे उभे राहिले म्हणून राजकारणात आलो असेही ते म्हणाले.

दोन्ही शिवसेना एकत्र येणार का ?

दोन्ही शिवसेना एकत्र होणे शक्या नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेचे काम करतोय. आम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही असेही मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us