AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवारांना अर्थखातं द्या, राष्ट्रवादीची मागणी; राहुल कुल यांनी नाराजीच्या चर्चांवर काय सांगितलं?

पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत कोणतीही नाराजी नसल्याचं भाजप आमदार राहुल कुल यांनी स्पष्ट केलं.

सुनेत्रा पवारांना अर्थखातं द्या, राष्ट्रवादीची मागणी; राहुल कुल यांनी नाराजीच्या चर्चांवर काय सांगितलं?
Sunetra PawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 16, 2026 | 8:43 PM
Share

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पुण्यात समन्वय बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या नाराजीच्या चर्चांवर भाजप आमदार राहुल कुल यांनी स्पष्टीकरण दिलं. बैठकीत कोणत्याही प्रकारची नाराजी नव्हती, असं सांगत त्यांनी या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी सुनेत्रा पवार यांना राज्याचं अर्थखातं देण्यात यावं, अशी मागणी केली. ही मागणी भाजपच्या नेत्यांमार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केल्याचंही त्यांनी सांगितलं. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी महायुती म्हणून एकत्रित काम करण्यावर भर दिल्याचंही यावेळी पाहायला मिळालं.

बैठकीत नाराजी नव्हती, राहुल कुल यांचं स्पष्टीकरण

बैठकीनंतर बोलताना भाजप आमदार राहुल कुल यांनी नाराजीच्या बातम्या फेटाळून लावल्या. बैठकीत सर्वांनी आपापली मतं मांडली आणि जिल्ह्याच्या राजकारणाचा आढावा घेतला. त्यानंतर महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या ताकदीने पाठिंबा देऊन निवडून आणण्यासाठी एकमताने निर्णय घेण्यात आल्याचं कुल यांनी सांगितलं.

दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचं सांगितलं आहे. पुण्याची पदवीधर मतदारसंघाची जागा पारंपरिकरित्या भाजपची आहे. या जागेबाबतचा निर्णय मुंबईत झाला आहे. त्यामुळे आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. पक्षाने एकजुटीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत, असं कुल यांनी स्पष्ट केलं. आजची बैठक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची होती. महायुतीच्या दोन्ही उमेदवारांसाठी एकत्रित काम करण्याचा निर्णय झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

सुनेत्रा पवार यांना अर्थखातं द्या, राष्ट्रवादीची मागणी

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी बैठकीबाबत माहिती दिली. या बैठकीला दोन्ही पक्षांचे सर्व नेते, आजी-माजी आमदार उपस्थित होते. दोन्ही मतदारसंघांबाबत चर्चा झाली असून, ही समन्वयाची बैठक होती, असं टिंगरे यांनी सांगितलं. सुनेत्रा पवार यांचा निरोप आल्यानंतर ही बैठक झाली, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

खातेवाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं खातं राष्ट्रवादीला दिलं जाईल, असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे अर्थखात्याबाबत आपण बैठकीत मागणी केल्याचं टिंगरे म्हणाले. सुनेत्रा पवार यांना राज्याचं अर्थखातं देण्यात यावं, अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडे केली आहे. ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावी, अशी विनंतीही त्यांना केल्याचं टिंगरे यांनी सांगितलं. अर्थखातं आमच्या हक्काचं होतं, म्हणून ही मागणी केली, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?