
Golden Man Sunny Nana Waghchoure: पिंपरी चिंचवड मधील गोल्डन मॅन सनी वाघचौरेला यांनी धमकीचा फोन आला आहे. 5 कोटी रुपये दे… नाही दिलेस तर तुझा बाबा सिद्दिकी करू… अशी धमकी गोल्डन मॅनला देण्यात आली आहे. यामुळे पुणे शहर हादरलं आहे. गोल्डन मॅन याला धमकी देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर, लॉरेन्स बिष्णोई गँगकडून गोल्डन मॅन याला धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी गोल्डन मॅन याने पोलिसांकडे तक्रार देखील दाखल केलं आहे. सांगायचं झालं तर, याआधी देखील अनेकदा बिष्णोई गँगकडून सेलिब्रिटींना धमकीचे फोन आणि मेसेज केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिष्णोई गँगने गोल्डन मॅन याला 5 कोटीच्या खंडणीसाठी फोन केलेला, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ततालयात याप्रकरणी तक्रारी अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे. 25 जानेवारीला पहिला फोन कॅनडा देशांच्या क्रमांकावरून आला आल्याची माहिती देखील समोर येत आहे.
गोल्डन मॅन याने दिलेल्या माहितीनुसार, व्हाट्सॲप कॉल उचलल्यानंतर मी बिष्णोई गॅंग मधून शुभम लोणकर बोलतोय, तू कोणाला पण विचार किंवा गुगल सर्च कर बिष्णोई गँग कोण आहे? बाकी तुला मेसेज वर बोलतो असं म्हणत त्याने फोन कट केला.
त्यानंतर 26 जानेवारीला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कॅनडामधील अशाच एका क्रमांकावरून गोल्डन मॅन याला मेसेज आला. मेसेजमध्ये लिहिलं होतं की, राम राम… मी शुभम लोकर… माझ्याबद्दल बिष्णोई गँगमधून माहिती काढून घे… तुझ्याकडून 5 कोटी रुपये हवे आहेत.
‘सनी तुला जिथे पळायचं आहे पळून घे… कोणतीच ताकद तुला वाचवू शकत नाही. तुझ्याकडे फक्त 5 दिवसांचा कालावधी आहे. तयार राहा गोळी कोणत्याही बाजूने येवू शकते… यावर तुझं उत्तर आलं नाही तर, तुझी बाबा सिद्दिकी सारखी अवस्था करु… जेवढं सोनं घालतोस ना, तेवढं पितळ तुझ्यामध्ये भरु… एवढं लक्षात ठेव…’ अशी भयानक धमकी गोल्डन मॅन सनी याला देण्यात आली आहे.
अशा आशयाचा मेसेज आल्यानंतर सनी वाघचौरे यांनी पोलिसांची मदत घेतली. मोबाईलवर आल्यानंतर सनीने पोलीस आयुक्तांकडे तक्रारी अर्ज दाखल केला आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाकडून तपास सुरू करण्यात आला आहे.