Sanjay Raut : वकील असताना तुमची भाषणं ऐकायचो, संजय राऊत आता तुम्हीच सांगा…त्या प्रकरणात न्यायमूर्तींची टिप्पणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Sanjay raut contempt of court case : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधातील अवमान याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने राऊत यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करत त्यांनी मनापासून माफी मागावी, असं म्हटलं.

Sanjay Raut : वकील असताना तुमची भाषणं ऐकायचो, संजय राऊत आता तुम्हीच सांगा...त्या प्रकरणात न्यायमूर्तींची टिप्पणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sanjay raut contempt case
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 17, 2026 | 3:31 PM

Sanjay raut contempt case : ठाकरे गटाची तोफ फायरब्रँड खासदार संजय राऊत यांच्याविरोधातील अवमान याचिकेवर आज कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे. यावेळी स्वतः राऊतांनी हजर राहावं असे कोर्टाचे आदेश होते, पण राऊत यांनी कोर्टात ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली. ही याचिका सुप्रीम कोर्टाच्या बार असोशिएशनकडून दाखल करण्यात आलेली आहे. पण आता ही सुनावणी आता पुन्हा ८ डिसेंबर रोजी होणार आहे. इतक्या मोठ्या स्वरूपाच्या प्रकरणात, माफी मनापासून असायला हवी. केवळ बुद्धीने दिलेली माफी नको. राऊतांनी मनापासून माफी मागावी, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

आजच्या सुनावणीमध्ये कोर्टामध्ये मोठी खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की, राऊत हे प्रतिष्ठीत नागरिक आहेत. ते उत्कृष्ट संसदपटूही आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अशा पद्धतीची विधानं अपेक्षित नाहीत, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी कोर्टाने केली आहे. यावेळी राऊतांच्या वकिलांनी सांगितलं की ते सामनाचे संपादकही आहेत.

Loading...

कोर्टाने असंही म्हटलं की, आम्ही वकिली जेव्हापासून करत होतो, तेव्हापासून संजय राऊतांची भाषणं ऐकत आलो आहोत. तुम्ही वरिष्ठ राजकारणी आहात. अनेक राजकीय डिबेटमधे तुम्ही असता. तुम्ही सांगा काय करायच ते.

त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांबद्दल केलेलं विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे, अशी टिप्पणी कोर्टाने केली आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे वकिल इंदीरा जयसिंग यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला, त्यांनी सांगितलं की, निखिल वागळेंकडून कोर्टाची बिनशर्त माफी मागितली गेली आहे. त्यावेळी संजय राऊतांचे वकिलांनीही सांगितलं की, संजय राऊंतानीही कोर्टाची माफी मागितली आहे.

मात्र, सुप्रीम कोर्ट बार असोशिएशनच्या अध्यक्षांकडून सांगितलं गेलं की, १९ ऑक्टोबर रोजी राऊत यांनी ही पोस्ट केल्याप्रकरणी राऊत यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली असली, तरी राऊत यांनी सोशल मीडियावर कोर्टाच्या विरोधात आणखी पोस्ट केल्या आहेत, त्यांनी अल्बेनियाच्या सर्वोच्च न्यायालयाची एक फोटो देखील पोस्ट केली होती ज्यामध्ये निदर्शक त्या इमारतीला आग लावताना दिसत आहेत, अशा पद्धतीची विधान खपवून घेतली जाणार नाही, असा युक्तिवाद झाला. त्यानंतर आता कोर्टाने याप्रकरणाची पुढील सुनावणी ८ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

आजची सुनावणी संपली तेव्हा कोर्टाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, संजय राऊत आणि निखिल वागळे या दोघांनीही कोर्टापुढे हजर राहावे. दरम्यान, यावेळी संजय राऊतांच्या वकिलाने कोर्टाला विनंती केली की, राऊतांना कॅन्सरसारखा आजार असून इतरही आरोग्याच्या समस्या आहेत. त्यामुळे त्यांना पुढील सुनावणीवेळी कोर्टात उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात यावी. ते ऑनलाईन पद्धतीने कोर्टात उपस्थित राहू शकतील, मात्र ही विनंती कोर्टाने फेटाळली आहे आणि उपस्थितीच्या सुचनांचे पालन व्हावे असं म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us