AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bilkis bano case | बिल्किस बानो प्रकरणावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

Bilkis bano case | बिल्किस बानो प्रकरणात काल सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. गोध्रा प्रकरणानंतर गुजरात दंगली दरम्यान ती पाच महिन्याची गर्भवती असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. गुजरात सरकारने या प्रकरणातील 11 आरोपींची मुक्तता केली होती. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. आता शरद पवार यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.

Bilkis bano case | बिल्किस बानो प्रकरणावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया
ncp chief sharad pawar reaction on bilkis bano case
| Updated on: Jan 09, 2024 | 12:44 PM
Share

मुंबई : बिल्कीस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काल महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात गुजरात सरकारने 11 आरोपींची मुक्तता केली होती. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बिवी नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने गुजरात सरकारचा हा निर्णय रद्द केला. गुजरात सरकारला सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे धक्का दिला. शिक्षेत दिलेली सूट योग्य नाही. सन्मान हा महिलेचा अधिकार आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटलं.

आज शरद पवार यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. “7 लोकांची हत्या आणि एक भगिनीवर अत्याचार याची सगळी पार्श्वभूमी गोध्राची आहे. गोध्रामध्ये जे काही घडल त्यानंतर ज्या Reacion झाल्या होत्या. त्यापैकी ही घटना आहे” असं शरद पवार म्हणाले. “उशिर लागला. पण निदान सुप्रीम कोर्टाने जे गुन्हेगार सहभाही आहेत, त्यांच्याबद्दल सक्त भूमिका घेतली. आणि या प्रकरणात स्त्री वर्गाला, सामान्य माणसाला आधार देण्याच काम सुप्रीम कोर्टाच्या निकालाने झालं” असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांना महाराष्ट्र सरकारकडून काय अपेक्षा?

“गुन्हेगारांना शिक्षा माफ करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतलेला. सुप्रीम कोर्टाने सांगितल की, हा निकाल महाराष्ट्र सरकारने द्यावा. आपण अपेक्षा करु की, महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचल्यानंतर त्यांनी जी भूमिका मांडली, त्याची गंभीर्याने दखल घेईल. त्या भगिनीला न्याय देण्यासाठी कुठलाही राजकीय अभिनिवेश मध्ये न आणता महाराष्ट्र सरकार त्या संबंधीचा निकाल देईल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र सरकारने या केसच गांभीर्य लक्षात घेऊन, अत्याचार करणारी प्रवृत्ती आहे, त्यांना समाजात संदेश जाईल अशी भूमिका घेतली पाहिजे” असं शरद पवार म्हणाले.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान