मोठी बातमी! शिवसेना कोणाची? त्या एका नोटीसमुळे शिंदेंच्या अडचणी वाढणार? निवडणूक आयोगाची चूक भोवणार? प्रकरणात मोठा ट्विस्ट

आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं? यावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे कोर्टामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जोरदार युक्तिवाद करत आहेत.

मोठी बातमी! शिवसेना कोणाची? त्या एका नोटीसमुळे शिंदेंच्या अडचणी वाढणार? निवडणूक आयोगाची चूक भोवणार? प्रकरणात मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हावर सुनावणी
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 13, 2026 | 3:30 PM

आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं? यावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे कोर्टामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जोरदार युक्तिवाद करत आहेत. या युक्तिवादादरम्यान त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं आता प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून मोठा दावा सुप्रीम कोर्टात करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने तथ्य तपासून निकाला का दिला नाही? असा सवाल सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे. तसेच नोटीस दिल्याशिवाय निवडणूक आयोग कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, आणि आम्हाला निवडणूक आयोगाकडून तशी कोणतीही नोटीस दिली गेली नसल्याचा दावा देखील सिब्बल यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले सिब्बल? 

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं? यावर सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कपील सिब्बल हे बाजू मांडत आहेत, यावेळी युक्तिवाद करताना त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.  नोटीस दिल्याशिवाय निवडणूक आयोग कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, आणि आम्हाला तशी कोणतीही नोटीस दिली गेली नाही, असा दावा कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केला आहे. दरम्यान संघटनात्मक रचनेवरून घटना चुकीची ठरवू शकत नाही, निवडणूक आयोगान तथ्य तपासून निर्णय का दिला नाही? असा सवाही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच  पक्षाची घटना, संघटनात्मक रचना, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

एखादा पक्ष काही करत नसेल तर आयोग फक्त नोंदणी रद्द करू शकतो, पक्षच कोणाला उचलून देऊ शकत नाही असा युक्तिवादही यावेळी सिब्बल यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने निर्णय दिला, असंही यावेळी सिब्बल यांनी म्हटलं आहे. जनता दलाचा निर्णय आम्हाला लागू होत नाही, असा दावा देखील त्यांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us