AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडी आणि सीबीआयच्या नोटिसा दिल्या, त्यामुळे… कपिल सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, ईडी आणि सीबीआयच्या नोटिसांनी शिवसेनेतील फुटीवर आणि राजकीय घडामोडींवर परिणाम केला. विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकांवर कारवाई केली नाही, तसेच निवडणूक चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा निर्णय लोकशाहीसाठी महत्त्वाचा असल्याचे सिब्बल म्हणाले.

ईडी आणि सीबीआयच्या नोटिसा दिल्या, त्यामुळे... कपिल सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 13, 2026 | 3:23 PM
Share

ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आजच्या सुनावणीवेळी ईडी आणि सीबीआयचा उल्लेख केला. पक्ष फुटल्यानंतर काहींना ईडीची आणि काहींना सीबीआयची नोटीस देण्यात आली. त्यामुळे राजकीय परिस्थिती प्रभावित झाली. ज्या घडामोडी घडल्या, त्याला त्याची मदतच झाली, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. आजच्या सुनावणीवेळी ठाकरे गटाची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी पक्ष चिन्ह आणि अपात्रता या मुद्द्यावर अधिक जोर दिला. सरन्यायाधीश सूर्यकांता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू असून कपिल सिब्बल हे कोर्टात घटनाक्रम मांडत आहेत.

जेव्हा शिवसेना फुटली. त्यावेळी कोर्टात प्रकरण आल्यावर सुप्रीम कोर्टाने सुरुवातीच्या आमदारांबाबत काय करावे याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष यांना दिले होते. हे प्रकरण आधी उच्च न्यायालयात गेलं होतं. तिथून सर्वोच्च न्यायालयात आल्याचं सिब्बल म्हणाले.

अध्यक्षांनी काय केलं?

विधानसभा अध्यक्षांनी 2023मध्ये आमदारांना नोटीसा बजावल्या. त्यावर तात्काळ उत्तरही देण्यात आलं. पण त्यावर अध्यक्षांनी काय केले? ज्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी पक्षाने केली होती, त्यावर काहीच झालं नाही, असं सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.

सर्वोच्च न्यायालय आदेश देऊ शकते?

उलट शिंदे गटाकडील आमदार दोन तृतियांश होण्याची वाट पाहिली गेली. त्यानंतर त्या पक्षाला मान्यता दिली गेली. विधानसभा अध्यक्ष हे एक न्यायाधिकरण (ट्रिब्यूनल) आहे. सुप्रीम कोर्ट त्यांना सूचना देऊ शकते, असं सांगतानाच त्यावेळी ज्या पद्धतीने घटना घडामोडी घडल्या. त्या पाहता त्यांना राजकीय मदत झाली. एकनाथ शिंदेंकडे गेलेल्या आमदारांना कुणाला ईडीची तर कुणाला सीबीआयची नोटीस देण्यता आली, असंही सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.

चिन्ह असं देऊ शकत नाही

सिब्बल यांनी यावेळी निवडणूक चिन्हाच्या नियमांबाबतची माहिती कोर्टाला दिली. निवडणूक चिन्ह कसे द्यायचे याचे काही नियम आहेत. आयोगाला कुणालाही सरसकट चिन्ह देण्याचा अधिकार नाही. काही प्रक्रिया ते करू शकत असेल तरी एवढा मोठा निर्णय आयोग घेऊ शकत नाही. पण अशा पद्धतीने आयोग किंवा विधानसभा अध्यक्ष कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. हे अत्यंत चुकीचं आहे. हे केवळ शिवसेनेसाठी नाही तर एकूणच देशासाठी आणि लोकशाहीसाठी महत्वाचे आहे. त्यामुळे यावर एक व्यवस्थित निर्णय येणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले.

Follow Us
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले