AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यावर नांदेडमध्ये धारदार शस्राने हल्ला

नांदेडच्या माता साहिब कौर भागातील गुरुद्वारात एका निहंगने धारदार शस्राने पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर कृपाणने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यावर नांदेडमध्ये धारदार शस्राने हल्ला
Akali Dal leader Sukhbir Badal attacked in Nanded
| Updated on: Aug 13, 2026 | 5:15 PM
Share

अकाली दालाचे नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर नांदेड येथे हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली असून त्यांनी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखी खाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून सुखबीर सिंग बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

नांदेडच्या माता साहिब कौर भागातील गुरुद्वारात पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल आले होते. त्यावेळी सुरक्षा व्यवस्था भेदत एका निहंगने धारदार शस्राने यांच्यावर कृपाणने हल्ला केला. या प्रकरणात घटनास्थळावरुन पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यातही घेतले आहे. नांदेडचे कलेक्टर राहुल कर्डिले यांनी सांगितले की सुखबीर सिंग बादल एका पर्सनल व्हिजिटसाठी नांदेड येथील गुरुद्वारात आले होते. त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले होते. या दरम्यान अचानक एका व्यक्तीने गुरुद्वारा परिसरात घुसून त्यांच्यावर अचानक धारदार शस्राने हल्ला केला. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात पोलिसांना देखील जखमा झाल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेड येथे झालेल्या हल्ल्याच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड पोलिस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे.  या घटनेत आरोपीला तत्काळ अटक केली असून हा हल्ला कोणत्या उद्देशाने  झाला, याची चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

बादल यांची प्रकृती स्थिर, आधी झाले होता हल्ला

दरम्यान, सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेड येथे रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्याच येत आहे.याआधीही झाला होता हल्ला या हल्लेखोराला घटनेनंतर लागलीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत. सुरक्षारक्षक एजन्सीने बादल यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. सुखबीर बादल यांच्यावर याआधी देखील हल्ले झाले आहेत. ४ डिसेंबर २०२४ रोजी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या बाहेर देखील त्यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी देखील ते थोडक्यात वाचले होते.

बादल यांच्यावर हल्ला करणारा वकील

सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला करणारा 62 वर्षीय जसपालसिंग पुणे येथील रहिवासी असून तो पुणे न्यायालयात वकीली करत होता. गेल्या दोनयेथेवर्षांपासून नांदेडच्या मुगट येथील मातासाब गुरुद्वारात तो सेवा देत होता.  आज सुखबीरसिंग बादल मातासाब गुरुद्वारातुन दर्शन घेऊन बाहेर पडताच त्याने त्यांच्यावर हल्ला केला. जसपालसिंग याला घटना स्थळावरुनच ताब्यात घेतले आहे. जसपाल सिंग याची पोलीस  कसून चौकशी करत आहेत.

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....