Sushma Andhare : दोन वर्षात दोन विकेट, देवेंद्र फडणवीस तुम्ही कुठल्या तोंडाने…सुषमा अंधारे यांचा थेट हल्ला

Sushma Andhare : "रवींद्र धंगेकर जरी चुकीच्या ठिकाणी असला तरी तो चांगला माणूस आहे. चांगला माणूस लोकांना नको वाटतो. लोकांना बरी बोलणारी माणसं हवी असतात, खरी बोलणारी नको असतात" असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

Sushma Andhare : दोन वर्षात दोन विकेट, देवेंद्र फडणवीस तुम्ही कुठल्या तोंडाने...सुषमा अंधारे यांचा थेट हल्ला
Sushma Andhare
| Edited By: | Updated on: Dec 18, 2025 | 1:12 PM

“प्रकाश शिंदेंच्या बांधाला काय माझा बांध आहे?. तुमचं माझं टेंडर काय एका कंपनीमध्ये आहे? मी काय खासदार आहे? मी काय आमदार आहे?. या सर्व चर्चेमध्ये तुमच्या रिसॉर्ट मधून जेवण गेलं. पोलिसांच्या तपासात येतय. सर्व सांगत असताना तुमची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे. ही सर्व चौकशी मुक्तपणे व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा” अशी मागणी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. “माणिकराव कोकाटे यांचा अचानक एवढा रक्तदाब वाढला असेल का?. अचानक कसे काय आजारी पडले?” असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारले आहेत.

“एकाच वेळी दोन उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या संदर्भात सुरू झालेलं वादळ भयंकर आहे. देवेंद्र फडणवीस कुठल्या तोंडाने तुम्ही स्वच्छ प्रतिमेचे ढोल वाजवणार आहात?. दोन वर्षात दोन विकेट जात आहेत.तिसरी विकेट पडण्याच्या मार्गावरती आहे. देवेंद्रजींना वाटतंय की ते स्वच्छ प्रशासन चालवतायत. प्याद्यांचे सोडा वजीरावरती बोलूयात” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांना भ्रष्ट आणि गुन्हेगार वृत्तीचे लोक लागतात

“महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती जास्तीत जास्त राष्ट्रवादी डॅमेज होईल व मला फायदा होईल असा विचार भाजप करतय. मुख्यमंत्री यांची इच्छाशक्ती आहे का?. मुख्यमंत्र्यांना भ्रष्ट आणि गुन्हेगार वृत्तीचे लोक लागतात. मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री पदाची सूत्र त्यांच्याकडे आहेत. मी त्यांना भेटणार आहे” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

चलो बक्ष दिया

“लाचारी वरती संजय शिरसाठ यांनी बोलावं का? तीन वर्ष कोट शिवून ठेवला होता. अमेझॉन किंवा नेटफ्लिक्स वरती विकायची वेळ आली होती. 50 वेळा मला मंत्रिपद मिळणारच आहे असं सांगत होतात. मी सांगायचं का लाचारी बद्दल?. खरचं काही लोकांवरती दया करून सोडून द्यावसं वाटतं. शिरसाट त्यांच्यापैकी एक आहेत. चलो बक्ष दिया” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.”रवींद्र धंगेकर जरी चुकीच्या ठिकाणी असला तरी तो चांगला माणूस आहे. चांगला माणूस लोकांना नको वाटतो. लोकांना बरी बोलणारी माणसं हवी असतात, खरी बोलणारी नको असतात” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.