Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खासगी विमानात बिघाड, ४५ मिनिटे…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खासगी विमानात बिघाड झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मुंबईहून दिल्लीला प्रवास करत असताना हा बिघाड झाल्याचे समोर आले आहे.

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खासगी विमानात बिघाड, ४५ मिनिटे...
Sunetra Pawar
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 11, 2026 | 1:25 PM

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खासगी विमानात बिघाड झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. हा बिघाड ९ जून रोजी मुंबईहून दिल्लीला जात असताना झाल्याचे समोर आले आहे. सुदैवाने, उड्डाणापूर्वीच हा बिघाड लक्षात आला. या बिघाडामुळे जवळपास ४५ मिनिटे उशिर झाल्याची माहिती समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या टीमकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांचा ९ जून रोजी दिल्ली दौरा होता. त्या ९ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता खासगी विमानाने मुंबईहून दिल्लीसाठी उड्डाण करणार होत्या. मात्र, ऐनवेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. या तांत्रिक बिघाडामुळे सुनेत्रा पवार यांना ४५ मिनिटे उशिरा झाला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई ते दिल्ली हा प्रवास सीएमआरच्या विमानाने केला आणि त्याच कंपनीच्या विमानाने दिल्लीहून मुंबईकडे आल्या आहेत. अखेर सर्व तांत्रिक बाबी तपासून आणि आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर, संध्याकाळी ५ चे ४५ मिनिटे उशिरा दिल्लीसाठी रवाना झाले.

सुनेत्रा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते

या विमान प्रवासात सुनेत्रा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही नेते देखील असल्याचे समोर आले आहे. या प्रवासात त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे प्रवास करत होते. सर्व नेते दिल्लीतील एका महत्त्वाच्या राजकीय बैठकीसाठी मुंबईहून निघाले होते. तेव्हाच हा बिघाड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सुनेत्रा पवार यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, प्रवासादरम्यान खाजगी विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानाला सुमारे 45 मिनिटे उशीर झाला होता. मात्र या घटनेचा व्हीएसआर कंपनीच्या विमानाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे. व्हीएसआर कंपनीचा संबंध दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताशी असल्याने भीतीचं वातावरण होतं, असं सांगितलं जात आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडून याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली असून त्यांनी कोणत्याही टप्प्यावर व्हीएसआरच्या विमानाचा वापर केलेला नाही, असे सांगण्यात आले आहे. तसेच प्रवास सुरक्षितपणे पूर्ण झाल्याची माहितीही देण्यात आली. या स्पष्टीकरणानंतर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Follow Us