AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटाच्या संपर्कात कोण कोण? संजय शिरसाट यांचं बेधडक विधान, ऑपरेशन टायगरचा मोठा खुलासा

संजय शिरसाट यांनी ठाकरे गटातील खासदार आणि आमदारांच्या शिंदे गटाशी संपर्कात असल्याची चर्चांना दुजोरा दिला आहे. 'ऑपरेशन टायगर'ची वेळ एकनाथ शिंदे ठरवतील, असे बेधडक विधान त्यांनी केले. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिरसाट यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाच्या संपर्कात कोण कोण? संजय शिरसाट यांचं बेधडक विधान, ऑपरेशन टायगरचा मोठा खुलासा
शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
| Updated on: Jun 11, 2026 | 1:38 PM
Share

ठाकरे गटाचे काही खासदार आणि आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी यावर भाष्य केलं आहे. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत. जेव्हा ऑपरेशन टायगर करायचं तेव्हा करूच. ते एकनाथ शिंदे ठरवतील, असं मोठं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना ऑपरेशन टायगरवर भाष्य केलं आहे. आम्ही कोणतेही ऑपरेशन टायगर करत नाही. पण ज्यांना यायचे त्यांना आम्ही नाही म्हणणार नाही. ऑपरेशन टायगर करण्याची आता आमची मानसिकता नाही. मात्र जेव्हा ऑपरेशन टायगर करायचे, तेव्हा एकनाथ शिंदे ठरवतील. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत. काही महिन्यात हे सर्व एकत्र राहतील असे वाटत नाही, असं सूचक विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे.

या मुजोरी म्हणावी लागेल

मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्यात येत आहे, त्यावरही शिरसाट यांनी भाष्य केलं. प्रताप सरनाईक यांनी ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी काही वेळ दिला होता. अनेक राज्यात त्या त्या राज्याची भाषा बोलली जाते. मग मुंबईत मराठी का नाही? एवढे करूनही ऐकत नसतील तर ही मुजोरी म्हणावी लागेल. मग कारवाई होईलच, असं शिरसाट म्हणाले.

राजकीय पोळी…

रोहित पवार आजपासून आंदोलन करत आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. रोहित पवार यांच्या आंदोलनाला आमचा विरोध होण्याचं कारण नाही. राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम रोहित पवार करत आहेत. पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, असं ते म्हणाले.

कारवाई थांबता कामा नये

अन्न आणि औषध प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. एफडीएच्या मोहिमेचं अभिनंदन केलं पाहिजे. मोठी कारवाई सुरू आहे. त्याचं स्वागत आहे. जे प्रोटेक्शन पाहिजे ते सरकार देईल. आतापर्यंत जे अधिकारी झोपले होते, अधिकारी काय करीत होते? हा प्रश्न आहे. का आपल्याकडे लॅब नाहीत? तपासणी होत नाही? काही लोकांचे लागेबांधे व्यापाऱ्यासोबत होते. ही कारवाई थांबता कामा नये, असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा