AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! तजिंदर बग्गांचा गंभीर आरोप; सोशल मीडियावर नवा वाद

CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! तजिंदर बग्गांचा गंभीर आरोप; सोशल मीडियावर नवा वाद

| Updated on: Jul 27, 2026 | 2:34 PM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभर चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे नव्या चर्चांना उधाण आलं असून, दिल्लीतील भाजप नेते तजिंदर बग्गा यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर शेअर केला आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP ने दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांसह आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.

दरम्यान, तजिंदर बग्गा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आंदोलन संपल्यानंतर CJP चे संस्थापक अभिजीत दीपके तसेच पक्षाचे इतर सदस्य एकत्र येऊन गाण्यांवर नृत्य करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

व्हिडिओ शेअर करताना तजिंदर बग्गा यांनी, “मला वाटलं होतं की CJP हे 21 विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत आहे. मात्र प्रत्यक्षात त्या मृत्यूंचा वापर केवळ आंदोलन, राजकारण आणि प्रसिद्धीसाठी करण्यात आला आणि आता ते जल्लोष करत आहेत,” असा आरोप करणारी पोस्ट केली आहे.

दरम्यान, या व्हिडिओची सत्यता किंवा तो नेमका कधी आणि कोणत्या संदर्भात चित्रित करण्यात आला, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. तसेच, CJP कडूनही या व्हिडिओवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून विविध स्तरांत चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Jul 27, 2026 02:34 PM

Follow Us