AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजप कार्यालयावर बॉम्बने हल्ला, थेट…, मोठी खळबळ

मोठी बातमी समोर आली आहे, भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मोठी बातमी! भाजप कार्यालयावर बॉम्बने हल्ला, थेट..., मोठी खळबळ
भाजप कार्यालयावर हल्ला Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 27, 2026 | 5:24 PM
Share

सध्या देशभरात पेपर लीकच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. दोनच दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी दिल्लीच्या जतंर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं होतं. संसदेवर देखील मोर्चा काढाण्यात आला होता. त्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं. दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानं आता वातारण थोडं शांत झालं आहे, परंतु आता पंजाबमधून मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात भाजपच्या जिल्हा कार्यालयावर मोठा हल्ला झाला आहे. भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला आहे.

पंजाबच्या संगरूरमध्ये भाजपच्या जिल्हा कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र कार्यालयाचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी बियर बॉटलचा वापर करून पेट्रोल बॉम्ब बनवला आणि तो भाजप कार्यालयावर फेकला. ही घटना रविवारी पहाटे तीन वाजता घडल्याची माहिती समोर येत आहे. हा पेट्रोल बॉम्ब भिंतवर धडकून फुटला, त्यानंतर भाजप कार्यालयाला आग लागली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. याबाबत बोलताना संगरूरचे एसपी दविंदर अत्री यांनी सांगितलं की, आम्ही घटनास्थळी पोहचून परिस्थितीची पहाणी केली आहे. एका बीअर बॉटलला पेट्रोल बॉम्ब बनवून हल्लेखोरांनी कार्यालयावर हल्ला केला. सध्या आम्ही या घटनेचा तपास करत आहोत. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्या कोणी हा हल्ला केला असेल त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू, कोणाचीही गय केली जाणार नाही.

यापूर्वी देखील झाले आहेत हल्ले 

दरम्यान भाजप कार्यालयावर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना नाहीये, तर यापूर्वी देखील भाजप कार्यालयावर हल्ले झाले आहेत.  गेल्या महिन्यात भाजप नेत्याच्या दवाखान्यावर हल्लेखोरांकडून पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच