AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेपरफुटीच्या आरोपाची MPSC कडून दखल, आयोगाचा मोठा निर्णय; पोलिसांची एन्ट्री होणार

MPSC Paper Leak : एमपीएससीचा औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या आरोपाची गंभीर दखल आयोगाकडून घेण्यात आली आहे.

पेपरफुटीच्या आरोपाची MPSC कडून दखल, आयोगाचा मोठा निर्णय; पोलिसांची एन्ट्री होणार
MPSC on Paper LeakImage Credit source: Google
| Updated on: Jul 27, 2026 | 5:10 PM
Share

संपूर्ण देशात सध्या पेपरफुटीची प्रकरणे चर्चेत आहे. आता एमपीएससीचा औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पेपर सेट करणाऱ्याने हा पेपर फोडला असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. तसेच या पेपरची 12 लाखांत विक्री झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. एका नायब तहसीलदाराच्या मुलांना परीक्षेनंतर सारखेच गुण मिळाल्याचे समोर आले आहेस त्यामुळे हा पेपर फुटल्याचा आरोप केला जात आहे. अशातच आता या सर्व प्रकरणाची आता राज्य लोकसेवा आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. आता आरोपांची पडताळणी करून पोलिसात तक्रार दिली जाणार असल्याची माहिती MPSC कडून देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

MPSC ने काय म्हटलं?

पेपरफुटीच्या आरोपांनंतर एमपीएससीच्या आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना आयुक्तांनी म्हटले की, अन्न आणि औषध प्रशासन या संवर्गाच्या 154 पदांसाठी 22 मार्च 2026 रोजी राज्यातील 6 विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 12 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला होता. दिनांक 1 जुलै ते 22 जुलै या काळात पात्र असलेल्ला 488 इतक्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 22 जुलै रोजी पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी जाहीर करण्यात आली होती.

दिनांक 21 जुलै रोजी गौरव पाटील नावाच्या ईमेल आयडीवरून 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे आणि तिचा लाभ एका उमेदवाराला झाल्याची तक्रार आयोगाच्या कार्यालयाला देण्यात आली होती. त्यावेळी तक्रारीत पुरावे नसल्याने संबंधित व्यक्तीला अधिकचे पुरावे सादर करण्याचे सुचित करण्यात आले होते. त्यानंतर गौरव पाटीलने आयोगाच्या कार्यालयात इमेलद्वारे हे पुरावे सादर केले होते.

पोलिसात तक्रार दाखल करणार

या पुराव्यांच्या अनुषंगाने तपासणी चालू असून आज 27 जुलै रोजी तक्रारदार व त्यांनी ज्या उमेदवाराला लाभ झाला असं नमूद केलं होतं. या दोघांनाही आयोगाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. हे दोघेही आज अनुपस्थित आहेत. आम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आम्ही आरोपांची आणि पुराव्याची सखोल तपासणी करणार असून संबंधित प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार