AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC चा पेपर 12 लाखांत फोडला? रोहित पवारांच्या आरोपांना कौटिल्य अकॅडमीच्या संचालकाचं एका वाक्यात उत्तर

एमपीएससीचा पेपर फोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. रोहित पवारांच्या आरोपांना कौटिल्य अकॅडमीच्या संचालकाने प्रत्युत्तर दिलं आहे.

MPSC चा पेपर 12 लाखांत फोडला? रोहित पवारांच्या आरोपांना कौटिल्य अकॅडमीच्या संचालकाचं एका वाक्यात उत्तर
| Updated on: Jul 27, 2026 | 1:57 PM
Share

एमपीएससीचा औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे. पेपर सेट करणाऱ्याने हा पेपर फोडल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. 12 लाखांत पेपरची विक्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. एका नायब तहसीलदाराच्या मुलांना परीक्षेनंतर सारखेच गुण मिळाले आहेत. त्यामुळे पेपरसाठी अॅडव्हान्सही दिल्याचा दावा करण्यात येत आहे. औषध निरीक्षक पदाचा हा पेपर कौटिरल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांनी फोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु रोहित पवारांचा आरोप फेटाळून चौकशीसाठी सामोरे जाण्यास तयार असल्याचं संचालक प्रवीण पाटील यांनी म्हटलं आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, औषध निरीक्षक पदाचा पेपर २२ मार्च रोजी होणार होता. मात्र तो २० मार्च रोजीच फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. या परीक्षेत एका तहसीलदाराच्या मुलाला १३ वा, तर मुलीला १६ वा क्रमांक मिळाल्याचाही दावा करण्यात आला आहे. मात्र हे सर्व आरोप कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. NEET पेपरप्रकरणानंतर आता औषधनिर्माण शास्त्राचा पेपरही फुटल्याच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील पेपरफुटीचे धागेदोरे नंदुरबारशी जोडले जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला, मात्र कौटिल्य अकॅडमीच्या संचालकांनी हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत.

कौटिल्य अकॅडमी संचालक प्रवीण पाटील यांनी म्हटलं की, ‘मी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही. एमपीएससीचा पेपर फुटतो, हे कधीही ऐकलेले नाही. ज्या घटना घडल्या आहेत, त्याविषयी माहिती नाही. संबंधित व्यक्ती माझ्याकडे अभ्यासाकडे यायच्या. विचारपूस करायच्या. मुलाखतीची तयारी कशी करायची, याची विचारपूस केली आहे. त्यांनी जवळपास 10 ते 15 वेळा विचारपूस केली आहे. व्हॉट्सअॅप चॅट आणि रेकॉर्डिंग चुकीच्या पद्धतीने करण्यात आलं आहे. मी चौकशीसाठी समोर जायला तयार आहे. मी गुन्हा केलेला नाही. त्यामुळे कोणता पैसा घ्यायचा संबंधच येत नाही. असं केलंच नाही, तर त्यावर काहीच बोलू शकत नाही. तो आरोप चुकीचा आहे. मी फार थोडी फी घेतो. विद्यार्थ्यांकडून 10 ते 12 हजार इतकी फी घेतो. माझा क्लास हा भाड्याच्या खोलीत चालतो. माझ्यावरील आरोप चुकीचे आहेत’.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार