AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एमपीएससीचा पेपर किती लाखाला फुटला? आकडा आला समोर; रोहित पवार यांचा खळबळजनक दावा काय?

एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाचा पेपर १२ लाखांना फुटल्याचा खळबळजनक दावा आमदार रोहित पवारांनी केला आहे. एका नायब तहसीलदाराच्या मुलांना सारखेच गुण कसे मिळाले, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पे

एमपीएससीचा पेपर किती लाखाला फुटला? आकडा आला समोर; रोहित पवार यांचा खळबळजनक दावा काय?
rohit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 27, 2026 | 12:00 PM
Share

एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पेपर सेट करणाऱ्यालाच सेट करण्यात आल्याने हा पेपर फुटल्याचा दावा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच एका नायब तहसीलदाराच्या दोन्ही मुलांना जवळपास सारखेच मार्क कसे मिळतात? असा सवालही त्यांनी केला आहे. या शिवाय औषध निरीक्षक भरतीचा पेपर किती लाखाला फुटला? त्याचे अॅडव्हान्स किती देण्यात आले आणि बाकी रक्कम कधी देण्यात येणार होती; याची माहितीही रोहित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पेपर फुटीचं रॅकेट कसं सक्रिय होतं आणि पेपर कसा फुटला गेला? याचं सविस्तर सादरीकरणच केलं. एफडीएने चांगलं काम सुरू केलं आहे. पण पैसे देऊन एखादा औषध निरीक्षक झालेला अधिकार असेल तर तो पैसेच वसूल करेल. किंवा चांगल्या पद्धतीने काम करू शकणार नाही. केवळ पैसे देऊन पेपर फोडून पास झालेला अधिकारी न्याय देऊ शकणार नाही, असं रोहित पवार यांनी सुरुवातीलाच माध्यमांना सांगितलं.

बार्शी कनेक्शन

एका प्रश्नपत्रिकेची किंमत १२ लाख किंमत होती. ५ लाख अॅडव्हान्स देण्यात आले होते. ७ लाख नंतर द्यायचे होते, असा दावा करतानाच पेपरफुटी प्रकरणात बार्शीचं कनेक्शन आहे, असा रोहित पवार यांनी केला. तसेच कट ऑफ १०५ चा होता. तरीही १०३ मार्क्स मिळालेल्या एका उमेदवारालाही मुलाखतीला बोलावलं होतं. का बोलावलं? कुणाचा दबाव होता? असा सवाल रोहित पवार यांनी केला.

मुलांना सारखीच रँक

यावेळी रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. नंदूरबारच्या नायब तहसीलदाराची दोन मुले परीक्षेला बसली. मुले हुशार असतील. पण मुलाची रँक आहे १३. त्याला १४९ मार्क मिळाले. मुलीची रँक आहे १६. तिला १४८ मार्क्स मिळाले. दोन्ही मुलांना जवळपास सारखीच रँक कशी असू शकते? हा योगायोग कसा असू शकतो? असा सवालही त्यांनी केला.

दोन दिवस आधीच…

आमचा एमपीएससीवर विश्वास आहे. पण नीट परीक्षात पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला. तसंच एमपीएससीमध्ये पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला. आता याचा आका कोण आहे? हे शोधलं पाहिजे. औषध निरीक्षक पदाच्या भरतीची परीक्षा २२ मार्च रोजी होती. त्याच्या दोन दिवस आधीच म्हणजे २० मार्च रोजी व्हॉट्सअपवर प्रश्न पाठवण्यात आले होते. व्हॉट्सअपवरून मुद्दाम १० प्रश्न चुकीचे सोडवा असं सांगण्यात आलं होतं. कारण कुणाला संशय येऊ नये म्हणून. या संदर्भातील व्हॉटसअप चॅटही समोर आल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. तसेच या चॅटमध्ये उमेदवाराने ७८ प्रश्न सोडवल्याचं सांगितलं. बाकीचे प्रश्न मनाने सोडवल्याचंही सांगितलं. जास्तीत जास्त प्रश्न सोडवल्याचं या उमेदवाराचं म्हणणं असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच