AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : MPSC पेपर फुटी प्रकरणात रोहित पवार यांचा खळबळजनक गौप्यस्फोट, डाऊनलोडमुळे हाती लागले पुरावे

Rohit Pawar : "पैसे देऊन एखादा पेपर विकत घेऊन एखादा औषध निरीक्षक झाला असेल तर तो प्रामाणिक काम करेल का ? तो पैसे वसूल करण्याचं टारगेट पहिल ठेवेलं. एका कफ सिरफने २२ मूल मेली होती त्याची तपासणीची जबाबदारी औषध निरीक्षकावर असते" असं रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar : MPSC पेपर फुटी प्रकरणात रोहित पवार यांचा खळबळजनक गौप्यस्फोट, डाऊनलोडमुळे हाती लागले पुरावे
Rohit Pawar
| Updated on: Jul 27, 2026 | 11:53 AM
Share

एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षा प्रश्नपत्रिका पेपर फुटी प्रकरणी रोहित पवार यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. रोहित पवार यांनी त्यांच्याकडे पुरावे असल्याचा सुद्धा दावा केला आहे. रोहित पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. एक प्रेझेंटेशन करुन त्यांनी हा पेपर कसा फुटला ते सर्व समाजवून सांगितलं.   “टीईटीचा पेपर एक दिवस आधी फुटला. नीटचा पेपर दोन दिवस आधी फुटला. एसआरपीएफचा पेपरही फुटला. एचएससी केमिस्ट्रीचा पेपरही एक दिवस आधी फुटला. औषध निरीक्षक परीक्षेचा पेपरही फुटलेला आहे. त्यावर मी बोलत आहे” असं रोहित पवार म्हणाले.

“पैसे देऊन एखादा पेपर विकत घेऊन एखादा औषध निरीक्षक झाला असेल तर तो प्रामाणिक काम करेल का ? तो पैसे वसूल करण्याचं टारगेट पहिल ठेवेलं. एका कफ सिरफने २२ मूल मेली होती त्याची तपासणीची जबाबदारी औषध निरीक्षकावर असते तर असे अधिकारी प्रामाणिक काम करतील का ?” असा सवाल रोहित पवार यांनी केला.

हे पेपर फुटीचं प्रकरण कसं बाहेर आलं?

“नंदूरबारच्या कौटिल्य अकादमीतील एका विद्यार्थ्यांना 90 टक्के प्रश्न आधीच मिळाले होते. 22 मार्च 2026 ला परीक्षा होती. पण 20 मार्चलाच परीक्षेचे प्रश्न मिळालेले. त्यामुळे या मुलांना अभ्यास करता आला. पैसे मिळाल्यावर तो माणूस व्हॉट्स अपवर प्रश्न पाठवायचा. दोन ते तीन मिनिटांनी डिलिट फॉर ऑल करायचा. ते डाऊनलोड केलेले प्रश्न एकाने आपल्या मित्राला पाठवले. त्यामुळे त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत” असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

मग त्याचा आका कोण आहे?

“खरी प्रश्नपत्रिका आणि फुटलेल्या पेपरची कॉपी दाखवली. 100 पैकी 90 प्रश्नांची कॉपी देण्यात आलेली होती.नीट परिक्षेत जसा पेपर सेट करणारी व्यक्ती फुटली तसाच हा पेपर सेट करणारी व्यक्ती फुटलेली आहे मग त्याचा आका कोण आहे हे शोधायला हवे” असं रोहित पवार म्हणाले.

पेपर फुटीचं बार्शी कनेक्शन

“चॅटही दाखवण्यात आले. बार्शीचे कनेक्शन दिसून येत आहे. एक नायब तहसीलदारची मुलें आहेत. त्याच्या एका मुलाला 13 वा रँक आणि मुलीला 16 वा रँक आला आहे. आता हा योगा योग आहे का? हा प्रश्न आहे. यामध्ये बार्शी कनेक्शन आम्हाला कळलं आहे. काही मुलांनी mpsc कडे तक्रार केली पण त्यावर कोणतेही उत्तर mpsc कडून आले नाही. अधिकारी विद्यार्थ्यांना धमकी देतायत की तुमच्यावर पोलीस कारवाई करू” असं रोहित पवार म्हणाले. “तुकाराम मुंडे यांनी सकारात्मक रिप्लाय केला. मात्र त्यांच्या अधिकारात बऱ्याचशा गोष्टी नाहीत.सबंधित अकादमीचे फॉरेन्सिक ऑडिट करून कॉल रेकॉर्ड्स तसेच व्हॉट्सअप चॅट रीट्रीव्ह करून कारवाई करावी” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

Follow Us
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप