मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच… प्रवासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रवासाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर आता अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास केला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई ते दिल्ली हा संपूर्ण प्रवास सीएमआर कंपनीच्या खाजगी विमानातून करण्यात आला होता
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रवासाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर आता अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास केला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई ते दिल्ली हा संपूर्ण प्रवास सीएमआर कंपनीच्या खाजगी विमानातून करण्यात आला होता. तसेच दिल्लीहून मुंबईकडे परत येतानाही त्याच कंपनीच्या विमानाचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, प्रवासादरम्यान खाजगी विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानाला सुमारे 45 मिनिटे उशीर झाला होता. मात्र या घटनेचा व्हीएसआर कंपनीच्या विमानाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे. व्हीएसआर कंपनीचा संबंध दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताशी असल्याने भीतीचं वातावरण होतं, असं सांगितलं जात आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडून याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली असून त्यांनी कोणत्याही टप्प्यावर व्हीएसआरच्या विमानाचा वापर केलेला नाही, असे सांगण्यात आले आहे. तसेच प्रवास सुरक्षितपणे पूर्ण झाल्याची माहितीही देण्यात आली. या स्पष्टीकरणानंतर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Jun 11, 2026 01:24 PM
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें

