Nanded | नांदेडमधील उस्माननगरमध्ये तणाव, महात्मा बसवेश्वर महाराजांचे बॅनर फाडल्याच्या कारणावरून असंतोष

बॅनर फाडण्याची दुसरीवेळ असल्याने लिंगायत गावकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे..

Nanded | नांदेडमधील उस्माननगरमध्ये तणाव, महात्मा बसवेश्वर महाराजांचे बॅनर फाडल्याच्या कारणावरून असंतोष
| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 12:53 PM

नांदेड | नांदेडमधील (Nanded) उस्माननगर (Osmannagar) येथे आज काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. महात्मा बसवेश्वर महाराजांचे (Basaweshwar Maharaj) बॅनर फाडल्याच्या कारणावरून उस्माननगर येथे गावकऱ्यांचा संताप झाला. या घटनेचा निषेध म्हणून नांदेड-बिदर राष्ट्रीय महामार्ग बंद केला. यावेळी गावकऱ्यांनी घोषणा देत बॅनर फाडण्याविरोधात निषेध व्यक्त केला. तसेच रस्त्यावर टायर जाळले. काही समाजकंटकांनी हे बॅनर काढल्यामुळे गावकऱ्यांमध्ये ही संतप्त प्रतिक्रिया उमटली.

रात्रीतून अज्ञातांनी फाडले बॅनर

उस्माननगर येथील महात्मा बसवेश्वर चौक पाटीवर हे बॅनर लावण्यात आले होते. मात्र काही समाज कंटकांनी रात्रीच्या वेळी हे बॅनर फाडले. अशा प्रकारे बॅनर फाडण्याची ही दुसरी वेळ असल्याने लिंगायत समाजाच्या नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. हे निंदनीय कृत्य करणाऱ्यांविरोधात गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केली.

दोषींना अटक करण्याची मागणी

दरम्यान, या घटनेचा निषेध करत गावकऱ्यांनी नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्ग बंद करत टायर जाळले. तसेच असे निंदनीय कृत्य करणाऱ्या समाज कंटकांना तत्काळ अटक करण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.